मुंबई,30 डिसेंबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood) कोरोनाचा कहर दिसून येत आहे. अर्जुन कपूर, अंशुला, रियानंतर आता अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) कोरोनाची लागण झाली आहे. नोराच्या जवळच्या सूत्रांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. 28 डिसेंबरला अभिनेत्रीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नोरा सध्या क्वॉरंटाईनमध्ये आहे. ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.
नोरा फतेहीच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती सर्वांना दिली आहे, त्यांनी माहिती देत म्हटलं आहे, 'नोरा फतेहीकडून आम्ही हे सांगू इच्छितो, की नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली आहे. २८ डिसेंबरला तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ती कोरोना नियमांचं पालन करत आहे. तिला होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. अभिनेत्री सध्या कोरोना नियमांचं पालन करण्यासोबतच बीएमसीलासुद्धा सहकार्य करत आहे'.
सोबतच अभिनेत्री नोरा फतेहीने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सोबतच अभिनेत्रीने सर्वांनां कोरोना पासून बचावासाठी खास संदेशही दिला आहे, अभिनेत्रीने पोस्ट करत लिहिलं आहे, 'मित्रांनो मी सध्या कोरोनाशी लढा देत आहे. मी सध्या झोपून आहे. पुढील काही दिवस मी अशीच राहणार आहे. सर्वांनी गोष्टीला गांभीर्याने घ्या. आणि मास्क घाला. आवश्यक ती काळजी घ्या. कोरोना फारच वेगाने पसरत आहे'. असं आवाहन अभिनेत्रीने केलं आहे.
सध्या नोरा आपल्या 'नाच मेरी रानी' या गाण्यामुळे चर्चेत आहे. ती गायक गुरु रंधावासोबत या गाण्याचं जोरदार प्रमोशन करत होती. दोघांना अनेक ठिकाणी प्रमोशन करताना पाहण्यात आलं होतं. दोघांचे अनेक डान्स व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Nora fatehi