Home /News /entertainment /

Sonali Khare: मायलेक चित्रपटात दिसणार Women Power चं वर्चस्व, सोनाली खरे काय सांगते पाहा

Sonali Khare: मायलेक चित्रपटात दिसणार Women Power चं वर्चस्व, सोनाली खरे काय सांगते पाहा

मायलेक (My Lek)या नव्याकोऱ्या चित्रपटातून सोनाली खरे (Sonali Khare) पुन्हा एकदा समोर येणार आहे. याच सिनेमाबद्दल अभिनेत्री सोनाली खरे ही न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय म्हणाली?

    मुंबई 21 जून: मराठी चित्रपटसृष्टीतील एक फिट अँड फाईन अभिनेत्री असं सध्या सोनाली खरे (Sonali Khare) हिला म्हणायला हवं. सोनालीने (Sonali Khare fitness) फिटनेसच्या क्षेत्रात जागरूकता आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत आणि ती ते यापुढे ही करताना दिसेल. सोनाली जितकी फिटनेसबद्दल चोख आहे तेवढीच ती अभिनयाच्या बाबतीत सुद्धा आहे. सोनाली येत्या काळात ‘मायलेक’ चित्रपटातून समोर येणार आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सोनाली न्यूज 18 लोकमत शी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जोडली गेली होती. त्यावेळी या चित्रपटाबद्दल तिने बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. 'मायलेक' (MyLek)हा चित्रपट तिच्यासाठी एका स्पेशल कारणाने फारच खास ठरणार आहे. यात सोनालीची मुलगी सुद्धा अभिनय करणार असून यात सोनाली आणि सनाया (Sanayaah Anand) या मायलेकींचीच जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आई-मुलीच्या आयुष्यतील छोट्याछोट्या गोष्टी टिपणारा हा एक मस्त चित्रपट असणार आहे. यात आई-मुलीचं नातं उलगडून सांगितलं जाणार आहे. या चित्रपटाची एकदम खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात असणारा स्त्रियांचा सहभाग. या चित्रपटातून प्रेक्षकांना women power ची ताकद बघायला मिळणार आहे. या फिल्मच्या टीममध्ये जास्तीत जास्त संख्या ही मुलींची आहे असं सोनाली सांगते. दिग्दर्शन, छायाचित्रण, कथा या सगळ्याच डिपार्टमेंटची धुरा महिला सांभाळताना दिसणार आहेत. महिला आघाडी असणारा हा एक कमाल चित्रपट कसा असेल याबद्दल एक वेगळीच उत्सुकता आहे. “हा चित्रपट माझ्यासाठी फारच खास आहे. असं मराठीत पहिल्यांदाच झालं असेल की सगळ्या HOD या महिला असणार आहेत. आमच्या टीममध्ये महिलांची संख्या जास्त आहे याचा खूप अभिमान वाटतो. त्याने एक वेगळीच एनर्जी सेटवर असेल. आणि मुख्य म्हणजे माझी खऱ्या आयुष्यातील मुलगी (Sonali Khare daughter) सनाया यात माझ्या रील लाईफमधल्या मुलीची सुद्धा भमिका साकारणार आहे. तिचा अजून एक चित्रपट सुद्धा आता रिलीज होईल. मुलीसोबत स्क्रीन शेअर करायला मजा येणार आहे. आमच्या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होईल.” असं सोनाली सांगते. मुलीच्या आयुष्यात तारुण्यात होणारे बदल, त्याचा आई-मुलीच्या नात्यावर होणार परिणाम यावर बेतलेला हा चित्रपट असेल असं सांगितलं जात आहे. सोनालीकडे सध्या एक फिटनेस इन्स्पिरेशन म्हणून पाहिलं जात आहे. तिने या लाईव्हमध्ये योगा विषयी उत्तम माहिती दिली, काही आसनं करून दाखवली. तसंच तिने फिटनेसच्या अनेक समज गैरसमजांबद्दल सुद्धा बरंच मार्गदर्शन केलं.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    पुढील बातम्या