मुंबई, 22 ऑगस्ट : मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनालीने चाहत्यांना तिचा हा लग्नसोहळा अनुभवता येणार असे संकेत दिले होते. सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाण्याचं निमंत्रणही दिलं होतं. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली आहे. अशातच सोनालीवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. सोनालीच्या सर्वात जवळीच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोनाली कुलकर्णीची सर्वात जवळची व्यक्ती तिची आजी सुशीला कुलकर्णी आता या जगात नाही. रविवारी तिच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समोर आली. सोनालीनं तिच्या इन्स्टाग्रामवर आजीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. व्हिडीओ शेअर करत सोनालीनं म्हटलं की, ‘आजी तू आमच्यात असशील.. आम्ही असे पर्यंत’. सुशीला कुलकर्णींच्या जाण्यानं सोनाली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोनालीनं इन्स्टाग्रामवर आजीसोबतच्या गोड क्षणाचा व्हिडीओ शेअर केलाय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोनालीच्या दुःखात तिचे चाहतेही सहभागी झाले असून तिची साथ देताना दिसत आहेत. हेही वाचा - Hemant Dhome: ‘आता बरोबर एक वर्षाने…’; हेमंत ढोमेनं शेअर केली खास POST दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोनाली लग्नामुळे चर्चेत आहे. चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. हा लग्नसोहळा एका मालिकेच्या रूपात काही भागांमध्ये प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रसारित झाला आहे.