मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonalee Kulkarni: महाराष्ट्राच्या अप्सरेचं लंडनमध्ये लग्न; सोनाली-कुणालच्या वेडिंग स्टोरीचा ट्रेलर आला समोर

Sonalee Kulkarni: महाराष्ट्राच्या अप्सरेचं लंडनमध्ये लग्न; सोनाली-कुणालच्या वेडिंग स्टोरीचा ट्रेलर आला समोर

सोनालीचं कुणालशी झालेलं लग्न तिच्या प्रेक्षकांनी मिस केलं. तिच्या लग्नाचा हा भव्य दिव्य सोहळा नेमका कसा होता याची छोटी झलक समोर आली आहे.

सोनालीचं कुणालशी झालेलं लग्न तिच्या प्रेक्षकांनी मिस केलं. तिच्या लग्नाचा हा भव्य दिव्य सोहळा नेमका कसा होता याची छोटी झलक समोर आली आहे.

सोनालीचं कुणालशी झालेलं लग्न तिच्या प्रेक्षकांनी मिस केलं. तिच्या लग्नाचा हा भव्य दिव्य सोहळा नेमका कसा होता याची छोटी झलक समोर आली आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 08 ऑगस्ट: महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा आणि विलक्षण होता आणि महामारीचा काळ संपल्यावर दोघांनी थाटात पुन्हा एकदा लग्न केलं. काही दिवसांपूर्वी सोनालीने चाहत्यांना तिचा हा लग्नसोहळा अनुभवता येणार असे संकेत दिले होते. सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाण्याचं निमंत्रणही दिलं होतं. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली असून या सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सोनाली आणि कुणाल (sonalee kulkarni wedding kunal benodekar) यांचं हे लग्न लंडनमध्ये पार पडलं. अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचं लग्न कसं झालं, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा सोनाली पूर्ण करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा एका मालिकेच्या रूपात काही भागांमध्ये प्लॅनेट मराठी ओटीटीवर दिसून येणार आहे. याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “ आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. माझंही होतं. पण जागतिक महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केलं. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आलं नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केलं. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवलं आणि आता प्रेक्षक माझा हा लग्नसोहळा आपला समजून पाहू शकतील याचा आनंद आहे.”
First published:

Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni

पुढील बातम्या