मुंबई, 11 डिसेंबर: शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) खरंच प्रेमात पडली आहे का? जे नातं तिने आतापर्यंत लपवून ठेवलं होतं, ते नातं तिने आता उघड केलं आहे का ? सोनाक्षीला तिचा जीवनसाथी सापडला आहे का ? असे अनेक प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे सोनाक्षी सिन्हाचे अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जवळच्या व्यक्ती सोबतचे नाते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच तिने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर मात्र अनेकजण अखेर सोनाक्षीला तिचे प्रेम सापडले, असाच अंदाज लावत आहेत. दोघांच्या नात्याबद्दल म्हणून होतेय चर्चा सलमान खानच्या आगामी ‘नोटबुक’ ( Notebook ) या चित्रपटाद्वारे झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या नात्यामुळे सोनाक्षी सिन्हा ही चर्चेत आहे. या नात्याबाबत दोघांनी आतापर्यंत मौन बाळगलं आहे. पण पहिल्यांदाच सोनाक्षीने झहीरचे फोटो शेअर करून एक खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चांगली चर्चा रंगू लागली आहे. दोन फोटो केले शेअर 10 डिसेंबर रोजी इक्बालचा वाढदिवस होता. सोनाक्षीने एक पोस्ट शेअर करून हा वाढदिवस आणखी खास बनवला आहे. या पोस्टमध्ये तिने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उभी असलेली दिसत असून झहीर तिच्या खांद्यावर हात ठेवून केसांवरून हात फिरवत आहे. तर, दुसऱ्या फोटोत दोघेही हातामध्ये शस्त्र घेऊन लढताना दिसत आहेत. पोस्टमध्ये नेमकं काय? ‘जगातील सर्वांत जास्त त्रास देणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जगातील सर्वोत्तम व्यक्तीदेखील आहेस. हे कसं घडू शकतं? तू असा कसा आहेस? तू जन्माला आल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय,’ अशी पोस्ट सोनाक्षीने झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केली आहे. या पोस्टसोबत तिने #bestbestfriend #whattaguy हे हॅशटॅगदेखील वापरले आहेत. हेही वाचा-
Bigg Boss 15: राखीने पती रितेशसोबत प्रेक्षकांना मूर्खात काढलं? नेटकऱ्यांनी सत्य आणलं समोर झहीरच्या कमेंटवरुन चाहत्यांनी लावला अंदाज सोनाक्षीच्या पोस्टवर तिचे मित्र आणि चाहते भरपूर कमेंट करत आहेत. तर झहीर यानेही खास कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘ती माझी बेस्ट फ्रेंड आहे’. या कमेंटसोबतच त्याने अनेक इमोजीही टाकल्या आहेत. तर,आणखी एका कमेंटमध्ये झहीरने लिहिले की, ‘आता मी तुला अधिकाराने माझी हिरोईन म्हणू शकतो का?’ ही कमेंट पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, दोघांनीही आपलं नातं मान्य केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.