मुंबई, 16 सप्टेंबर- बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ओळखलं जातं. सोनाक्षी नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते. अलीकडे चित्रपटांपेक्षा जास्त सोनाक्षी सिन्हा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या लव्ह लाईफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. परंतु अभिनेत्रीने कधीच उघडपणे आपलं प्रेम व्यक्त केलेलं नाहीय. परंतु सर्वांनाच माहिती आहे की, सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बर्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. परंतु ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. तसेच ती पार्टी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सतत दिसून येते. विशेषतः बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत ती आजकाल दिसून येत आहे. नुकतंच सोनाक्षी आणि जहीरचा एक फोटो शेअर करत वरुण शर्माने लिहलंय, 'ब्लॉकबस्टर जोडी'.
'फुकरे' फेम अभिनेता वरुणने शेअर केलेल्या फोटोमध्ये जहीर इकबर आणि सोनाक्षी सिन्हा स्माईल करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसून येत आहे. याच कारणामुळे वरुणने फोटोला कॅप्शनदेत लिहलंय, 'ओये...होये... याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी.' या फोटोमध्ये सोनाक्षीने पांढरा ब्लेझर परिधान केलाआहे.तर जहीरने प्रिंटेड शर्ट घातला आहे. वरुणने दोघांचा हा फोटो शेअर केल्यापासून हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
(हे वाचा:Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री; शेअर केली पोस्ट )
जहीर आणि सोनाक्षी बऱ्याचवेळा एकत्र दिसून आले आहेत. पण सोनाक्षीला तिच्या खाजगी आयुष्याबाबत बोलायला फारसं आवडत नाही. नुकतंच एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत बोलण्यापेक्षा तिच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलणं पसंत करते. माझ्या खाजगी आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. त्यासाठी ते अंदाज बंधू शकतात'. सध्या सोनाक्षी आणि जहीरचा हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Sonakshi sinha