मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री; शेअर केली पोस्ट

Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री; शेअर केली पोस्ट

बॉलिवूड किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे.

बॉलिवूड किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे.

बॉलिवूड किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूड किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. ड्रग्स प्रकरण, आयपीएल ऑक्शन,अनन्या पांडे त्यानंतर आता आपल्या फोटोशूमुळे चर्चेत आहे. नुकतंच आर्यन खानने एक रॉकिंग फोटोशूट केलं होतं. हे फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाले होते. दरम्यान आता प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आर्यनच्या प्रेमात पडली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभिनेत्रीने शाहरुख खानचा लेक आर्यन खानवर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सर्वांनाच प्रश्न पडला असेल की, ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत 'मॉम' चित्रपटात या अभिनेत्रीनं काम केलं आहे.

ही अभिनेत्री आहे सजल अली. ही अभिनेत्री पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या अनेक मालिका आणि चित्रपट जगभरात आवडीने पहिले जातात. या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आर्यन खानचा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या बॅकग्राउंडला तिने 'हवायें' हे गाणंसुद्धा जोडलं आहे. आर्यनचा फोटो शेअर करत सजल अलीने हार्ट इमोजीही बनवला आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हे वाचा:Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीचा नाझीला नताशीसोबत झाला Break Up; 'या' कारणामुळे होतेय चर्चा )

सजल अलीने 2017 मध्ये 'मॉम'मध्ये श्रीदेवीसोबत काम केलं होतं. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटात तिला चांगली पसंती मिळाली होती. सेजल ही पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2022 मध्ये आपला को-स्टार अहद रजासोबत लग्न केलं आहे. कामाबाबत सांगायचं तर सजल लवकरच बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता शेखर कपूर यांच्या एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

First published:

Tags: Aryan khan, Bollywood News, Entertainment, Shahrukh khan