मुंबई 13 मार्च: सोमी अली (Somy Ali) ही 90च्या दशकात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. सलमान खानची (Salman Khan) गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत आलेल्या सोमीनं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु या सर्व चित्रपटांना मिळालेल्या यशाचं श्रेय तिनं निर्माते,अभिनेते आणि दिग्दर्शकांना दिलं आहे. सोमीला अभिनयात बिलकूल रस नव्हता तरी देखील तिला संधी मिळाली किंबहूना तिच्यासोबत काम केलेल्या प्रत्येक कलाकारानं तिच्या नखऱ्यांना सहन केलं यासाठी तिनं आता माफी मागितली आहे.
मूळची पाकिस्तानी असलेल्या सोमी अलीचं तसं बॉलिवूडमधील करिअर अल्पकालीन होतं. सुमारे 10 चित्रपट केल्यानंतर सोमी अलीनं बॉलिवूड सोडलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिनं पीपिंगमूनला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, "मी नेहमीच दुःखी अभिनेत्री असायचे, मला धीर दिल्याबद्दल माझ्या सहकलाकारांचे मी आभार मानते. मी सर्वात वाईट डान्सर असून मला आता अभिनय करण्यात रस नाही. मी 10 चित्रपट कसे केले याचा विचार करताना मला धक्का बसतो. माझ्या सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला माफ करावं. मला अभिनयात रस नव्हता. मी डान्सच्या सरावाला कधीही गेले नाही. नृत्य दिग्दर्शिका सरोजजी माझ्यावर नेहमीच चिडायच्या. त्यांच्यासोबत काम करताना मला आनंद मिळाला. त्या खूपच अमेझिंग होत्या. पण मला अभिनयात कधीच रस नव्हता. मी मला दिलेल्या संवादांच्या अनुषंगाने कधीच सराव केला नाही."
अवश्य पाहा - आलिया भट्टला डच्चू; 200 कोटींच्या चित्रपटात या फ्लॉप अभिनेत्रीची वर्णी
"मी स्वतः 10 चित्रपट केले कसे, या विचारानं मला धक्का बसतो. सलमान खानपासून संजय दत्तपर्यंत, सैफ अली खानपासून चंकी पांडे, गोविंदापर्यंत तसेच मिथुन चक्रवर्ती आणि दिवंगत ओम पुरी या सर्व माझ्यासोबत काम केलेल्या अभिनेत्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. विशेषतः मिथुनदा यांची. कारण मी त्यांच्यासोबत 4 चित्रपट केले होते. या सर्वांनी मला अक्षरशः सहन केलं. सुनील, मला वाईट याचं वाटतं की मी सर्वात वाईट डान्सर होते" असं सोमी अलीनं मुलाखतीत म्हटलं आहे.
अंत (1994), कृष्ण अवतार (1993), यार गद्दार (1994), तिसरा कौन (1994), आओ प्यार करे (1994), आंदोलन (1995), माफिया (1996) चुप्प (1997) या चित्रपटांमध्ये सोमी अलीने भूमिका साकारल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.