Home /News /entertainment /

क्रेझी फॅनमुळे अभिनेत्री त्रस्त; ‘त्या’ कृतीसाठी पाठवलं थेट तुरुगांत

क्रेझी फॅनमुळे अभिनेत्री त्रस्त; ‘त्या’ कृतीसाठी पाठवलं थेट तुरुगांत

अभिनेत्रीला पाहताच करायचा ती कृती; अखेर पोलिसांनीच दिली चांगली समज

    मुंबई 26 जून: गरम मसाला (Garam Masala) या चित्रपटातून नावारुपास आलेली अभिनेत्री निकिता रावल (Nikita Rawal) सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. जवळपास एक दशक तिनं बॉलिवूडमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न केला तरी तिला म्हणावं तसं यश संपादन करता आलं नाही. तिच्यावर प्लॉप अभिनेत्रीचा शिक्का मारण्यात आला. अखेर सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाला वैतागून निकितानं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे तिनं सिनेसृष्टिला रामराम ठोकला असला, तरी देखील तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये बिलकूल कमतरता झालेली नाही. तिला पाहण्यासाठी आजही तिच्या घरासमोर गर्दी होते. मात्र यापैकी एका फॅनमुळं निकिता वैतागली आहे. (Nikita Rawal Files FIR against Stalker) तिनं या व्यक्तीविरोधात थेट पोलीस तक्रार दाखल केली आहे. सलमानची Fat बहिण कशी झाली Fit? 40 किलो वजन कमी करत दिल्या खास टिप्स एक व्यक्ती गेले अनेक दिवस पाठलाग करत असल्याची जाणीव निकिताला होत होती. सुरुवातीला तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु नंतर तो दररोज तिच्याच मागे चालत असल्याची नोंद घेतली. हा व्यक्ती अनेकदा तिच्या सोसायटीच्या गेटवर देखील येऊन उभा राहायचा. मग संतापलेल्या निकितानं वॉचमनच्या मदतीनं त्याला चांगलीच समज दिली. मात्र असं करुन देखील त्यानं पाठलाग काही थांबवला नाही. अखेर या पाठलाग करणाऱ्या व्यक्तीविरोधात तिनं पोलीस तक्रार केली आहे. ‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत निकितानं या प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “या व्यक्तीमुळं तिची मानसिक स्थिती खराब होत होती. तिला रस्त्यावर चालताना भीती वाटायची. तो कुठल्या इराद्यानं तिचा पाठलाग करतोय हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात घोंगावत राहायचा. त्याला अनेकदा मी समज दिली परंतु त्यानं आपली कृती थांबवली नाही. त्यामुळं अखेर नाईलाजानं मी त्याच्याविरोधात तक्रार केली. आता पोलीस त्याला चांगली समज देतील.”
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या