'तेरी मेरी...' नंतर रानू मंडल यांचं दुर्गा पूजा साँग, तुम्ही पाहिलात का हा VIDEO

'तेरी मेरी...' नंतर रानू मंडल यांचं दुर्गा पूजा साँग, तुम्ही पाहिलात का हा VIDEO

कोलकातामधील दुर्गा पूजेच्या निमित्तानं रानू यांनी एक बंगाली गाणं रेकॉर्ड केलं.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल आता प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रिलीज झालं असून याशिवाय त्यांनी प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियासोत 3 गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर रानू मंडल यांच्या नावाचीच चलती आहे. स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगर होण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा असाच होता. दरम्याच्या काळात त्याचे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले. पण आता एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या बंगली भाषेतील दुर्गापूजेचं गाणं गाताना दिसत आहे.

कोलकातामधील दुर्गा पूजेच्या निमित्तानं रानू यांनी एक बंगाली गाणं रेकॉर्ड केलं. त्याच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रानू यांचं हे गाणं त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदर रेकॉर्ड केलं होतं असं बोललं जातं. त्यानंतर त्यांनी मुंबईतून परत्यानंतर त्यांनी या गाण्याला फायनल टच दिला आहे. हे बंगाली दुर्गा पूजा थीमचं गाणं प्रीतम डे यांनी लिहिलं आहे.

हॉट सीटवर बसून KBC खेळण्याऐवजी पतीशी भांडू लागली स्पर्धक, वाचा नक्की काय झालं

आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे. याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे.

जेव्हा ट्रम्प-मोदींसाठी अमेरिकन दूतावास गातं हे धम्माल गाणं, पाहा VIRAL VIDEO

एक वेळ होती की, रानू मंडल राणाघाट स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागत होत्या मात्र एका व्हिडीओनं त्यांचं आयुष्य बदललं. रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं 'प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउंटवर अपलोड केला.

त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

रानू यांचे  व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी एतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं.

'ही' व्यक्ती आहे शाहरुख खानची कार्बन कॉपी, PHOTO पाहून तुम्ही व्हाल थक्क!

आपल्या गाण्याविषयी रानू सांगतात, 'गाण्यासाठी मी कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. रेडिओ किंवा टेपवर लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मी गाणं शिकले आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करु लागले.' तरुण वयात रानू क्लबमध्ये गात असत पण पुढे लग्न झाल्यावर त्यांच्या सासरच्या विरोधामुळे त्यांना गाणं सोडावं लागलं.

=============================================================

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

Published by: Megha Jethe
First published: October 1, 2019, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading