...म्हणून कंगनाने कार्यालयाची दुरुस्ती करणार नसल्याचा केला निर्धार, म्हणाली उद्ध्वस्तच....

...म्हणून कंगनाने कार्यालयाची दुरुस्ती करणार नसल्याचा केला निर्धार, म्हणाली उद्ध्वस्तच....

कंगनाचे हे ऑफिस याच वर्षात जानेवारीमध्ये तयार झालं होतं. याची किंमत 48 कोटींपेक्षाही जास्त आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : सध्या देशभरात कंगना रणौतची मोठी चर्चा सुरू आहे. मुंबई पालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत तोडला. त्यानंतर अद्यापही कंगनाचं ट्विटरयुद्ध सुरूच आहे. ती वारंवार मुंबई पालिका आणि शिवसेनेविरोधात वक्तव्य करीत आहे. आज कंगनाने आपल्या उद्धवस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली. यामध्ये तिला मोठं नुकसान झालं असल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर कंगनाने पुन्हा एक ट्विट केलं आहे.

त्यामध्ये तिने लिहिलं आहे की - 15 जानेवारीला मी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या महासाथीने सर्वच ठप्प केलं. इतरांप्रमाणे या दिवसात माझ्याकडेही काम नव्हत. त्यामुळे सध्या या कार्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी अशाच परिस्थितीत येथे काम करणार..माझं हे कार्यालय जगात स्वत: उभं राहू पाहणाऱ्या महिलांचं प्रतिक असेल. कंगनाचे हे ऑफिस याच वर्षात जानेवारीमध्ये तयार झालं होतं. याची किंमत 48 कोटींपेक्षाही जास्त आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहे. कंगनाने काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर अनेक शिवसैनिकांनी राग व्यक्त केला होता. यानंतर ठिकठिकाणाहून कंगनाच्या विरोधात निषेध केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला ड्रामा म्हटलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 10, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading