मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच’, कंगनाच्या मागे राजकीय पक्ष; राऊतांनी पुन्हा फटकारलं!

‘मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच’, कंगनाच्या मागे राजकीय पक्ष; राऊतांनी पुन्हा फटकारलं!

'शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise.'

'शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise.'

'शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise.'

मुंबई 4 सप्टेंबर: अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादळ निर्माण झालं आहे. संजय राऊतांवर टीका करत मुंबई हे काय POK आहे का असा प्रश्न तिने केला होता. त्यावर महाराष्ट्रातून तिच्यावर जोरदार टीका झाली होती. खासदार संजय राऊत यांनीही पुन्हा एकदा कंगनाला नाव न घेता फटकारलं आहे. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय राऊत म्हणाले, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise. असं ट्वीट करत त्यांनी पुढची दिशा काय राहिल याचे संकेतच दिले आहेत. या आधी कंगनाने ट्वीट करत टीका केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.

'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असं खुल आव्हान कंगनानं दिलं आहे.

सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने केलेल्या विधानांमुळे आणि त्यानंतर मुंबईची पाक व्याप्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विविध स्तरामध्ये कंगनावर अनेकांनी नाराजीचा सूर दाखवला. मुंबईविरुद्ध वक्तव्य केल्यानंत संतप्त ट्वीट करत मराठी कलाकारांनी खडेबोल सुनावले होते.

First published:

Tags: Kangana ranaut, Sanjay raut