मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Jubin Nautiyal ला रुग्णालयातून डिस्चार्ज; हेल्थ अपडेट शेअर करत म्हणाला 'देवाने मला...'

Jubin Nautiyal ला रुग्णालयातून डिस्चार्ज; हेल्थ अपडेट शेअर करत म्हणाला 'देवाने मला...'

जुबिन नौटियाल

जुबिन नौटियाल

जुबिन नौटियालच्या अपघाताची बातमी ही समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तो बरा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता खुद्द जुबिनने हेल्थ अपडेट शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई 3 डिसेंबर : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला. अपघातात त्याची कोपर तुटली असून त्याच्या बरगड्यांनाही दुखापत झाली. याशिवाय गायकाच्या डोक्याला आणि कपाळावरही जखमा झाल्या आहेत. जुबिनसोबत हा अपघात घडताच त्याला तात्काळ मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशातच आता जुबिन नौटियालची हेल्थ अपडेट समोर आली आहे. त्याने पोस्ट शेअर करत त्याची हेल्थ अपडेट शेअर केली.

जुबिन नौटियालच्या अपघाताची बातमी ही समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तो बरा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता खुद्द जुबिनने हेल्थ अपडेट शेअर केली आहे. जुबिनने इन्स्टाग्रामवर एक हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याने लिहिलं, 'तुमच्या सर्व आशीर्वादांसाठी धन्यवाद. देव माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि त्या भीषण अपघातातून मला वाचवले. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी बरा होत आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थना बद्दल धन्यवाद.'

जुबिनच्या या पोस्टवर चाहते कमेंट बॉक्समध्ये त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तसेच, जुबिनच्या पोस्टवर सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देत आहेत. निती मोहनने लिहिले आहे की, 'लवकर बरा हो, तुला खूप प्रेम आहे.' रॅपर बादशाहने लिहिले, 'भाऊ लवकर बरा व्हा.' अशा अनेक प्रतिक्रिया जुबिनच्या पोस्टवर येत आहेत. त्याचा हा हॉस्पिटलमधील जेवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जुबिनने अनेक मेहनतीने बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांमध्ये जागा मिळवली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याचे लोखो चाहते असून तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या गाणीही ट्रेंड करत असतात. त्याने त्याच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

दरम्यान, जुबिन नौटियालचं नुकतंच 'तू सामने आये' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात त्याने गायक योहानीसोबत आवाज दिला आहे. गायकाने गुरुवारी योहानीसोबत हे गाणे लाँच केले. जुबिनचे हे गाणे खूप पसंत केले जात आहे. याशिवाय बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांतील गाण्यांना सिंगरने आपला आवाज दिला आहे. त्यांचे अनेक म्युझिक व्हिडिओ देखील आले आहेत जे सुपरहिट झाले आहेत. जुबिन नौटियाल राता लंबियां, लूट गए, हमवा मेरे आणि तुझे कितने चाहने लगे हम, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा यांसारख्या आंतरराष्ट्रीय हिट गाण्यांसह, लोकांना त्याला व्हिडिओंमध्ये पाहायला आवडते. अलीकडेच या गायकाने गोविंदा नाम मेरा मधले बना शराबी शमिल आणि थँक गॉड या चित्रपटातील माणिके हे गाणेही गायले आहे.

First published:

Tags: Accident, Bollywood, Singer