मुंबई, 27 जुलै- मनोरंजनसृष्टीतुन पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. सिद्धू मुसेवालानंतर आता पंजाबी गायक बलविंदर सफरी यांचं निधन झालं आहे. या बातमीने पुन्हा सिनेजगतात शोककळा पसरली आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धू मुसेवाला या प्रसिद्ध पंजाबी गायकाचं निधन झालं होतं. त्यांनतर आता बलविंदर सफरी यांचं निधन झालं आहे. या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एकाच वर्षात पंजाबी संगीत जगतातील दोन दिग्गज हरपले आहेत. 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडशी जोडला होता. या घटनेत गँगस्टर गोल्डी बराडने एक व्हिडिओ जारी केला आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.
सिद्धू मुसेवालानंतर आता संगीत जगताने आणखी एक कलाकार गमावला आहे. गायक बलविंदर सफरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र अचानक त्यांची तब्ब्येत खालावली आणि काल त्यांचं निधन झालं या गायकाने गेली तब्बल 86 दिवस मृत्यूशी झुंज दिली. परंतु त्यांचा हा लढा अपयशी ठरला. ते सध्या 63 वर्षांचे होते.
(हे वाचा:Arvind Dhanu: शालिनीच्या रिल लाईफ पप्पांचं निधन; अभिनेते अरविंद धनू यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू )
मीडिया रिपोर्टनुसार या प्रसिद्ध गायकाला अनेक आजारांशी सामना करावा लागला होता. हृदयासंबंधी असलेल्या तक्रारींमुळे त्यांना एप्रिल महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर ट्रिपल हार्ट सर्जरीदेखील करण्यात आली होती. या सर्जरीनंतर ते बरेच दिवस कोमात होते. त्यांनतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. मात्र अचानक त्यांचं निधन झाल्याने सर्वानांच धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचं सिटी स्कॅन करण्यात आलं होतं, आणि त्यामध्ये त्यांच्या डोक्यावर काही जखमेचे व्रण दिसून आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Panjab, Playback singer