नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla Demise) याच्या निधनाचं दु:ख पचवणं सर्वांसाठी कठीण आहे. गुरुवारी सकाळी हृदयविकाऱ्याच्या झटक्यामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. तुम्हाला माहीत आहे का, सिद्धार्थला नशेच्या व्यसनामुळे तब्बल दोन वर्षे रीहॅबमध्ये राहावे लाहले होते. याबद्दलची प्रतिक्रिया स्वत:ला सिद्धार्थ यानेच दिली होती.
दोन वर्षांपर्यंत होते रिहॅब सेंटरमध्ये?
अनेक बातम्यांनुसार, सिद्धार्थ शुक्ला याला नशेचं व्यसन होतं. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्यानंतर तो जास्त प्रमाणात नशा करीत होता. यामुळे त्याला रागावर नियंत्रण ठेवणंही कठीण जात होतं. हे व्यसन सोडण्यासाठी तो तब्बल 2 वर्षे रिहॅब सेंटरमध्ये राहिले होते.
सिद्धार्थने काय दिलं होतं उत्तर
याबद्दल जेव्हा बिग बॉसच्या घरात चर्चा झाली, तेव्हा सिद्धार्थने हे चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. त्याने 'आप की अदालत' या मालिकेमध्येही याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, ते इतकी वर्षे सतत स्क्रीनवर दिसत आहेत. मग दोन वर्षांपासून ते रीहॅबमध्ये कधी गेले होते. सिद्धार्थच्या या उत्तराने अनेकांची बोलती बंद केली होती.
हे ही वाचा-SiddharthShukla: रात्री घरी परतल्यानंतर सिद्धार्थच्या BMWची मागची काच फुटली होती
का जावं लागलं होतं तुरुंगात
2018 मध्ये रॅश ड्रायव्हींग केल्या प्रकरणी सिद्धार्थ शुक्ला याला तुरुंगात जावं लागलं होतं. मात्र काही वेळात त्याची सुटका झाली होती. याबद्दल त्याने अनेकदा मोकळपणाने संवाद साधला आहे. त्याने आपली चूक मान्यही केली होती. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इंटीरियर डिजायनरची नोकरी
खूप कमी जणांना माहीत असेल की सिद्धार्थ शुक्लाने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक कामं केली आहेत. इतकच नाही तर तो नोकरीदेखील करीत होती. सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याने कधी विचारही केला नसेल की तो टीव्ही क्षेत्रात इतका चमकेल. त्याने आपल्या शालेय शिक्षणानंतर इंटीरियर डिजायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. यानंतर तो आरबीआयमध्ये इंडिनिअर म्हणून नोकरी करीत होता.
2005 मध्ये त्याच्या यशाला सुरुवात झाली. सिद्धार्थ देशातील पहिला असा मॉडेल ठरला की ज्याला वर्ल्ड बेस्ट मॉडन याने गौरविण्यात आलं. तो पहिला भारतीय आणि एशियन होता ज्याने हा टायटल मिळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Heart Attack, Sidharth shukla