मुंबई, 02 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (
Sidharth Shukla) निधनाच्या बातमीने फिल्म इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थला मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू (
Sidharth Shukla death) हृदयविकाराच्या झटक्याने (
Heart Attack) झाल्याचे सांगितले. 'बालिका वधू' या शोमधून प्रसिद्धी मिळवलेल्या सिद्धार्थचे मोठे फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या जाण्यानं चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
बीएमडब्ल्यू कारची काच फुटली?
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, काल रात्री सिद्धार्थ शुक्ला त्याच्या बीएमडब्ल्यू (Siddharth Shukla Bmw car) कारने आपल्या घरी पोहचला, त्यावेळी कारची मागील काच फुटलेल्या अवस्थेत होती. सिद्धार्थच्या गाडीची ती अवस्था पाहून आता बरेच तर्क-वितर्क लावले जात आहेत, सिद्धार्थची काल रात्री कोणाशी भांडण झालं का? किंवा रात्री काय घडले ज्यामुळे त्याच्या कारची मागील काच फुटली? ज्यामुळे तो रात्रभर अस्वस्थ होता?
कुटुंबाचा कोणावरही संशय नाही
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. कूपर हॉस्पिटलचे डॉ. निरंजन यांनी त्याच्या मृत्यूबाबत डेथ बिफोर अरायव्हल सांगितले आहे. सध्या सिद्धार्थच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. पोलीसही आता सक्रिय झाले आहेत आणि त्याच्या घरी पोहोचून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला.
झोपण्यापूर्वी औषध?
मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री घरी परतल्यानंतर सिद्धार्थ खोलीत गेला आणि झोपेच्या आधी काही औषध खाल्ले. तो सकाळी उठलाच नाही, तेव्हा त्याला बेशुद्ध अवस्थेत मुंबईच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूबद्दल सांगितले. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री शोकाकुल झाली आहे.
हे वाचा -
हसता-बोलता Heart Attack ने घेतला जीव; Sidharth Shukla च्या मृत्यूनंतर हादरवणारा हा VIDEO
सिद्धार्थची बहीण आणि तिचे पतीही रुग्णालयात पोहोचले आहेत. सिद्धार्थ त्याच्या दोन बहिणींपैकी सर्वात लहान होता आणि तो त्याच्या आईच्या खूप जवळ होता. सिद्धार्थने मॉडेलिंगद्वारे टेलिव्हिजनपासून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.