अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचं निधन झालं. दरम्यान आज सिद्धार्थच्या मृतदेहावर मुंबईतील ओशिवारा याठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत. याठिकाणी सिद्धार्थची आई रीता शुक्ला (Rita Shukla) आणि त्याची सर्वात जवळची मैत्रिणी शेहनाझ गिल दाखल झाल्या आहेत. रडून-रडून दोघींचीही अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
सिद्धार्थ त्याच्या घरामध्ये सर्वात लहान आणि एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दोन्ही बहिणींचा लाडका भाऊ होता. दोन्ही बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला गमावलं आहे. सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं दु:ख फार मोठं आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
ब्रह्मकुमारी परंपरेनुसार सिद्धार्थवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपल्या मुलाला शेवटचं अलविदा म्हणण्यासाठी ही आई तिच्या मुलींसह ओशिवारा याठिकाणी पोहोचली आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
शेहनाझ त्याच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाली आहे. यावेळी तिची अवस्था अत्यंत बिकट पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाही आहेत.(फोटो सौजन्य- विरल भयानी)
स्मशानभूमीमध्ये सिद्धार्थची आई, बहिणी, शेहनाझ आणि इतर कुटुबीयांसह टीव्ही जगतातील त्याचे मित्र-मैत्रिणी उपस्थित आहेत.. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
याठिकाणी कोणत्याही प्रकारे पॅनिक निर्माण होऊ नये याकरता मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. याठिकाणी गुरमीत चौधरी, अर्जून बिजलानी, विकास गुप्ता, राहुल महाजन, दिव्यांका त्रिपाठी दहिया यांसह अनेक कलाकाल पोहोचले आहेत.(फोटो सौजन्य- विरल भयानी)
सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारादरम्यान पाऊसही दाखल झाला आहे. सिद्धार्थचे चाहते देखील स्मशानभूमीच्या गेटपर्यंत पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांकडून सर्वतोपरी ही गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)