Home /News /entertainment /

सिद्धार्थला मुलगा मानायचे प्रत्युषा बॅनर्जीचे वडील, लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याने केली होती आर्थिक मदत

सिद्धार्थला मुलगा मानायचे प्रत्युषा बॅनर्जीचे वडील, लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याने केली होती आर्थिक मदत

Sidharth Shukla and Pratyusha Banerjee

Sidharth Shukla and Pratyusha Banerjee

प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जींनी एका मुलाखतीत सिद्धार्थबद्दल सांगितलं होतं की लॉकडाउनच्या काळात सिद्धार्थने त्यांना पैसे पाठवले होते. सिद्धार्थच्या जाण्याने प्रत्युषाच्या वडिलांनाही मोठा धक्का बसला आहे.

मुंंबई, 04 सप्टेंबर: टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचंं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंं. काल मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ हा केवळ 40 वर्षांचा होता. इतक्या कमी वयात सिद्धार्थचा अचानक मृत्यू झाल्याने त्याचे चाहते, टीव्हीजगत आणि बॉलिवूड सगळ्यांनाच खूप मोठा मानसिक धक्का बसला. अजूनही अनेक जण त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. दबंग सलमान खान आणि माधुरी दीक्षित यासारख्या दिग्गजांनीही सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी कळताच ट्वीट करून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्याचे सहकलाकार-मित्रमैत्रिणी यांच्यासाठी तर हा मोठा धक्काच होता. सिद्धार्थ हा प्रोफेशनल लाइफमध्ये जसा चांगला अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता तसाच तो खासगी आयुष्यातही होता. त्याने बालिका वधू या हिंदी सीरिअलमध्ये अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (Pratyusha Banerjee) हिच्यासह प्रमुख भूमिका साकारली होती. सिद्धार्थने शिवची तर प्रत्युषाने आनंदीची भूमिकी केली होती. ही जोडी त्या काळात खूप गाजली होती. प्रत्युषाने देखील जगाचा लवकर निरोप घेतला होता, तिने 2016 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतरही सिद्धार्थ तिच्या कुटुंबीयांशी संपर्कात होता. तिच्या आईवडिलांची चौकशी तो करायचा. हे वाचा-सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी या अभिनेत्री-पोलिसांमध्ये जुंपली, Watch Video प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जींनी (Pratyusha Banerjee father Shankar Banerjee) एका मुलाखतीत सिद्धार्थबद्दल सांगितलं होतं की लॉकडाउनच्या काळात सिद्धार्थने त्यांना पैसे पाठवले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर शंकर बॅनर्जी म्हणाले, 'मला हेच समजत नाही आहे की हे घडलं कसं? मी सिद्धार्थला आपला मुलगा मानायचो. बालिका वधू मालिकेदरम्यान माझी मुलगी प्रत्युषा आणि सिद्धार्थ यांची चांगली मैत्री झाली होती. तो आमच्या घरीही अनेकदा यायचा. प्रत्युषाच्या मृत्युनंतर तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दलही लोकांनी काहीतरी चर्चा सुरू केली होती. त्यामुळे सिद्धार्थने आमच्या घरी येणं बंद केलं. त्यानंतर तो मला मेसेज पाठवायचा आणि चौकशी करायचा.' सिद्धार्थ त्यांना केलेल्या आर्थिक मदतीबाबत शंकर बॅनर्जींनी माहिती दिली. ते म्हणाले, 'या लॉकडाउनच्या काळात सिद्धार्थ मला नियमितपणे मेसेज करायचा. काही महिन्यांपूर्वीच मला त्याचा शेवटचा मेसेज आला होता. तो मेसेजमध्ये विचारायचा की अंकल आणि आंटी मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? तुम्ही नीट आहात ना मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो का? त्याने एकदा तर जबरदस्तीने मला 20 हजार रुपये पाठवून दिले होते.' हे वाचा-सलमानने सिद्धार्थबाबत केलेली मस्करी ठरली खरी! BBच्या घरात केली होती भविष्यवाणी सिद्धार्थ असा दिलदार होता की तो आपल्या सहकलाकाराच्या मृत्युनंतर तिच्या कुटुंबियांची चौकशी करायचा आणि त्यांना आर्थिक मदतही त्याने केली होती. त्यामुळे त्याच्या अभिनयाबरोबरच या सगळ्या आठवणी कायमच त्याच्या चाहत्यांच्या स्मरणात राहतील.
First published:

Tags: Siddharth shukla

पुढील बातम्या