मुंबई, 2 सप्टेंबर : कलासृष्टीतील असे कलाकार आहेत ज्यांच्या जाण्यानं सर्वत्र खळबळ माजली होती. त्यांच्या जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसला होता. यातीलच एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं होतं. आज सिद्धार्थ शुक्लाची पहिली पुण्यतिथी आहे. त्याच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चाहते आज त्याची आठवण काढताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सिद्धार्थच्या अनेक आठवणी व्हायरल होताना दिसत आहेत. सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 40 व्या वर्षी मृत्यू झाला. ही बातमी समोर येताच सगळीकडे शोककळा पसरलेली पहायला मिळाली. सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा निरोप घेऊन एक वर्ष पूर्ण झाले असले, पण त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. मृत्यूच्या काही तास आधी सिद्धार्थने रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आईकडे पाणी मागितले आणि तब्येत ठीक नसल्याचे सांगून झोपी गेला. यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत तो उठला नाही, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सिद्धार्थ शुक्लाची फॅन फॉलोइंग कोणत्याही प्रकारे बॉलिवूडच्या सुपरस्टार्सपेक्षा कमी नव्हती. देशभरात त्यांचे करोडो चाहते आहेत. टीव्ही मालिका बालिका वधूमधून घरोघरी आपली छाप पाडणाऱ्या सिद्धार्थने बिग बॉस 13 जिंकून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करत आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. हेही वाचा - सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला सेटवरच कोसळलं रडू, इमोशनल VIDEO खतरों के खिलाडी सीझन 7 आणि बिग बॉस 13 सारखे रिअॅलिटी शो जिंकून सिद्धार्थ प्रसिद्धी झोतात आला. अनेक संगीत अल्बममध्येही तो दिसला. सिद्धार्थचे नाव बिग बॉस 13 मधील स्पर्धक शहनाज गिलसोबत जोडले गेले. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.