मुंबई, 2 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidharth Malhotra & Kiara Advani) यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. अशातच दोघेही कियाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला गेले होते. आता दोघेही लंडनवरुन मुंबईत परतले आहे. मुंबई एअरपोर्टवरी दोघांचाही स्पॉट करण्यात आलं असून दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कियारा आणि सिद्धार्थ दोघांचे विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकमेकांसोबत खासगी वेळ घालवल्यानंतर हे जोडपे काल रात्री मुंबईत परतले आहे. यावेळी पापराझींना कंटाळून सिद्धार्थ चिडलेला पहायला मिळाला. फोटो आणि व्हिडीओसाठी पापराझींचा गडबड, गोंधळ बघून सिद्धार्थ म्हणाला, ‘असं काय करताय जसं की पहिल्यांदाच आम्हाला सोबत पाहिलंय’.
गेल्या वर्षी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा चाललेला पहायला मिळाला. कियारा आणि सिद्धार्थला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र आजतागायत दोघांनीही या प्रकरणी मौन सोडलेले नाही. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा वक्तव्य याविषयी केलेलं नाही. मात्र त्यांना सोबत पाहून त्यांचे मात्र खूप आनंदी आहेत. हेही वाचा - आलियाच्या Darlingsसिनेमाच्या स्क्रिनिंगला मराठमोळ्या संतोष सईची खास उपस्थिती; फोटो आला समोर 31 जुलै रोजी कियाराचा वाढदिवस होता तिच्या वाढदिवसांनिमित्त सिद्धार्थनं एक क्युट व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर शेअर केला होता. शुभेच्छा देत सिद्धार्थनं लिहिलं की, ‘हॅपी बर्थ डे की, अशा अनेक BTS व्हिडीओ आणि मजेशीर व्हिडीओंसाठी चिअर्स, खूप सारं प्रेम आणि प्यार की झप्पी’.