मुंबई, 8 जानेवारी- बॉलिवूडची 'बबली गर्ल' अभिनेत्री काजोल नेहमीचचर्चेत असते. काजोलचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. परंतु सध्या काजोलची लेक न्यासासुद्धा प्रचंड चर्चेत असते, बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच न्यासा एक स्टार बनली आहे. न्यासा सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी आपल्या मित्रांसोबत पार्ट्यांमुळे तर कधी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने न्यासा सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आजही न्यासा चर्चेत आली आहे. मात्र आज कारण फारच खास आहे. नुकतंच न्यासाने आई आणि अभिनेत्री काजोलसोबत सिद्धीविनायकाच दर्शन घेतलं आहे. काजोल आणि न्यासाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आज रविवारचं निमित्त साधत काजोल आपल्या लेकीसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचली होती. दर्शन घेऊन बाहेर पडताना या दोघींना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. यावेळी या दोघीही पारंपरिक अंदाजात दिसून आल्या. न्यासाने दर्शनासाठी येताना पांढऱ्या रंगाचा चिकनकरीचा सलवार-सूट परिधान केला होता. तर काजोलने फ्लोरल कुर्ता परिधान केला होता. या दोघींनी बाप्पाचं दर्शन घेत कपाळावर अष्टगंध लावलं होतं. या दोघींना पाहताच त्याठिकाणी मोठी गर्दी झालेली दिसून आली.
(हे वाचा: Sonu Nigam: 'मी फालतू लोकांसाठी..'; बॉयकॉट बॉलिवूडबाबत सोनू निगमचं मोठं वक्तव्य)
प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काजोल आणि न्यासाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये न्यासा पांढरा सलवार-सूट परिधान करुन केस मोकळे सोडून हातात पूजेची थाळी आणि कपाळावर अष्टगंध लावून चालताना दिसून येत आहे. तर तिच्या मागे आई काजोल चालत येताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
बऱ्याच वेळा न्यासा देवगनचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओ-फोटोमध्ये न्यासा अनेकवेळा वेस्टर्न-ग्लॅमरस अंदाजात दिसून येत असते. तिच्या कपड्यांवरुन तिला बरंच ट्रोलदेखील केलं जातं. नुकतंच न्यासाचे नवीन वर्षाच्या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसून आली होती. या फोटोंवरुन न्यासाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु आज न्यासाचा सलवार-सूटमधील पारंपरिक अंदाज पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत. तिचं भरभरुन कौतुक करत आहेत.
परंतु न्यासा आजही काही नेटकऱ्यांच्या टीकेपासून स्वतःला वाचवू शकली नाही. काही नेटकरी असे आहेत. ज्यांनी या व्हायरल फोटो आणि व्हिडीओमधील न्यासाच्या हवभाववरुन तिची खिल्ली उडवली आहे. यामध्ये काही नेटकऱ्यांनी म्हटलंय, 'पूर्ण कपडे घालणे बहुतेक न्यासाला पसंत नाही'. म्हणून ती असे एक्सप्रेशन देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.