मुंबई, 12 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला चा आज वाढदिवस आहे. आज जरी तो आपल्याच नसला तरी त्याचे चाहते, मित्र-परिवार त्याची आठवण काढत आहेत. आज तो हयात असता तर त्याचा 42 वाढदिवस साजरा करत असता. अशातच सिद्धार्थसाठी अभिनेत्री शहनाज गिलने खास पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सध्या तिची पोस्ट झपाट्याने व्हायरल होत आहे. शहनाज गिलने रात्री 12 वाजता इन्स्टाग्रामवर सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिले, ‘मी तुला पुन्हा भेटेन…’ यासोबतच तिने व्हाइट हार्ट इमोजी शेअर करत 12.12 लिहिले. शहनाजने तिच्या स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. शहनाजच्या या हृदयस्पर्शी पोस्टने सध्या चाहते खूप भावुक झाले असून काही क्षणातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर सिद्धार्थला मिळणारं प्रेम पाहून अजूनही तो चाहत्यांच्या मनात जीवंत असल्यांच दिसून येतंय.
शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. इथूनच त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. लोकांनी त्याच्या नावाने हॅशटॅगही बनवले होते ‘सिडनाज’. सिड-नाजमुळे बिग बॉस 13 हा टीव्ही इतिहासातील सर्वात यशस्वी शो मानला जातो. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज यांच्यातील घट्ट नाते पाहून सलमान खाननेही त्यांना सल्ले द्यायला सुरुवात केली. या दोघांमुळे हा शो खूप चर्चेचा विषय ठरला. अजूनही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दरम्यान, 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्याच्या अचनाकपणे जाण्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. 2008 मध्ये, सिद्धार्थने करिअरची सुरुवात मनोरंजन व्यवसायात ‘बाबुल का आंगन छुटे ना’ मधून केली. तो बिग बॉस 13 चा विजेता होता आणि त्याने ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ सारख्या मालिकांमधून तो घराघरात पोहचला. आजही या अभिनेत्याची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.