मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: चूप माही चूप है रांझा! सिद्धार्थ कियाराची केमिस्ट्री पाहून चाहते बेभान

VIDEO: चूप माही चूप है रांझा! सिद्धार्थ कियाराची केमिस्ट्री पाहून चाहते बेभान

सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हीट होताना दिसत आहे.

सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हीट होताना दिसत आहे.

सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हीट होताना दिसत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 8 ऑगस्ट : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani)  ‘शेरशाह’ (Shershah)  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. पण सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हीट होताना दिसत आहे.

‘रांझा’ (Ranjha) हे चित्रपटातील गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. याचं गाण्यावर त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात सिद्धार्थने कियाराला उचलून देखील घेतलं आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री अगदी जुळून आली आहे.

दरम्यान मागील काही काळापासून सिद्धार्थ आणि कियाराच्या रिलेशनशिपच्या (Siddharth Malhota Kiara Advani affair) चर्चा आहेत. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांनी कधीही जाहीररीत्या त्यांचं यावर काही बोललं नाही. मात्र उंच भुवया करून पाहणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांना कपल म्हणून घोषित देखील केलं आहे. त्यांच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ वर अनेकांनी त्यांना लग्नाविषयी देखील प्रश्न विचारले आहेत.

मुंबईच्या रस्त्यांवर मलायकाची हवा; पडद्यावरच नाही इथेही दिसला फॅशनचा जलवा

काहीच दिवसांपूर्वी कियाराचा वाढदिवस होऊन गेला. तेव्हा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत सिद्धार्थ देखील उपस्थित होता. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर जवळपास शिक्कामोर्तब करून टाकलं आहे.

12 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर ‘शेरशाह’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन देखील सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची टिम कारगीलमध्ये प्रमोशनसाठी गेली होती. कारगीलच्या युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा शहीद झाले होते. त्यांचा बायोपिक शेरशाह चित्रपट आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Kiara advani, Sidharth Malhotra