मुंबई, 28 जानेवारी- कालपासून सोशल मीडियावर श्वेता तिवारी (Shweta Tiwari) प्रचंड चर्चेत आहे. कारणसुद्धा तसंच आहे. अभिनेत्रीने केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी श्वेतावर प्रचंड कठोर शब्दांत टीका केली आहे. श्वेताने माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं वक्तव्य करत सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे. दरम्यान आता अभिनेत्रीने असं वक्तव्य का केलं यांचा खुलासा झाला आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतंच आपल्या आगामी ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यावेळी श्वेता तिवारीने ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. इतकंच नव्हे तर श्वेताच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत मध्य प्रदेश सरकार अॅक्शनमध्ये आली आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलीस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीचं वक्तव्य ऐकलं आणि पाहिलं असून हे विधान आक्षेपार्ह असल्याचं गृहमंत्री म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना भोपाळ आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
का केलं होतं वक्तव्य- या सर्व प्रकरणानंतर भोपाळमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाचा होस्ट सलील आचार्य याने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सलीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं म्हटलं आहे, ‘श्वेता तिवारीच्या एका विधानावर गोंधळ होत आहे. परंतु त्यामध्ये थोडा गैरसमज होत आहे. कारण त्यावेळी स्टेजवर मीच होतो. आणि मीच एक प्रश्न विचारला होता हे उत्तर त्यातीलच एक संदर्भ आहे. (हे वाचा: दोन लग्न, घटस्फोट, मुलाची कस्टडी खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिलीय Shweta ) यावेळी आमच्यासोबत अभिनेता सौरभ जैनसुद्धा होता. सौरभने अनेक पौराणिक भूमिका साकारल्या आहेत. त्याने अनेक मालिकांमध्ये देवाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मी त्याला प्रश्न विचारला होता देवाच्या भूमिकेपासून सरळ ब्रा फिटरची भूमिका? यावरच बोलताना श्वेता म्हणाली होती हा याच देवाकडून आम्ही फिटिंग करून घेत आहोत’. सलीलने विनंती केली आहे श्वेताचं वक्तव्य पूर्णपणे समजून घ्या त्याची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर आणू नका’.