मुंबई, 14 ऑगस्ट : प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 4 ची विजेती श्वेता तिवारी मागच्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच श्वेतानं तिचा पती अभिनव कोहलीच्या विरोधात पोलिस तक्रार नोंदवली होती. अभिनव याच्यावर श्वेतानं घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तिनं समता नगर पुलिस स्टेशन, कांदिवली (E)मध्ये अभिनवच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी मजिस्ट्रेट कोर्टानं त्याला 15 हजाराच्या दंडासह जामीन मंजूर केला. मात्र त्याच्यावरील केसचा निकाल अद्याप लागलेला नाही.
टाइम्स ऑफ इंडियान प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनव कोहलीला बोरीवली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. याआधी मिळालेल्या माहितीनुसार श्वेता आणि तिच्या पतीमध्ये मागच्या बऱ्याच काळापासून खूप वाद सुरू आहेत. याशिवाय अभिनवनं श्वेताची मुलगी पलक तिवारीला मारहाण करत तिला अपशब्द वापरले होते. याबाबत अभिनवची आई म्हणजेच श्वेताच्या सासूला विचारलं असता. त्या म्हणाल्या, ‘श्वेता मागच्या काही काळापासून अभिनवकडे घटस्फोट मागत आहे. पण त्याला हे मान्य नाही. तो त्याचा मुलगा रेयांशसाठी तिच्यासोबत राहू इच्छितो. मात्र त्या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय या बद्दल मला काहीही माहीत नाही.’
निकच्या 'या' शर्टलेस फोटोंना ट्रोल करणाऱ्यांवर प्रियांका वैतागली
याशिवाय श्वेताची मुलगी पलक तिवारीनं तिच्या इन्स्टाग्रामपोस्टमधून या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. पलकनं लिहिलं, ‘सर्वात आधी मी त्या सर्वांचे आभार मानते ज्यांनी काळजी दाखवली आणि आम्हाला मदत केली. पण आता मी मला माझ्या बाजूनं काही गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. मीडियाकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आणि असणारही नाही. मी पलक तिवारी अनेकदा घरगुती हिंसाचाराची शिकार झाले आहे. मात्र माझ्या आईसोबत असं काहीही घडलेलं नाही. त्यांनी तक्रार दाखल करण्याच्या दिवसापर्यंत आईवर कधीच हात उचलला नव्हता. वाचक म्हणून ते जाणून घेणं कठीण आहे की बंद दरवाजामागे काय चाललं आहे. माझ्या आईनं तिच्या दोन्ही लग्नांच्या वेळी किती धाडस केलं आहे हे कोणालाच माहीत नाही आणि कोणीही अशा परिस्थितीचा सामना केला नसेल त्यामुळे कोणालाही आमच्या या परिस्थितीवर कमेंट करण्याचा काहीही अधिकार नाही.'
प्रभाससोबत रिलेशिपमध्ये आहे अनुष्का, शोधतेय नवं घरं?
पलक पुढे लिहिते, 'अभिनव कोहलीनं मला कधीच चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केलेला नाही. किंवा माझं शारीरिक शोषण केलेलं नाही. अशा प्रकारच्या बातम्या पसरवण्याआधी आपण सत्य काय आहे हे समजून घेणं गरजेच आहे. त्यानं अनेकदा माझ्यावर अश्वील कमेंट केल्या आहेत. अशा की ज्या एखादी मुलगी किंवा महिला ऐकू शकत नाही. अशा प्रकारच्या कमेंटची अपेक्षा तुम्ही तुमच्या वडीलांकडून करत नाहीत. सर्वजण सोशल मीडियावरून आमच्या आयुष्याबाब जाणण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या खाजगी जीवनावर कमेंट करण्याएवढं कोणालाही काही माहिती नाही.'
हार्ड कौरची मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ट्विटरनं केली 'ही' कारवाई
===============================================================
पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा