जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वेब सीरिजमध्ये श्वेता तिवारीचा BOLD अवतार, सोशल मीडियावर Video Viral

वेब सीरिजमध्ये श्वेता तिवारीचा BOLD अवतार, सोशल मीडियावर Video Viral

वेब सीरिजमध्ये श्वेता तिवारीचा BOLD अवतार, सोशल मीडियावर Video Viral

टीव्ही सिरिअल ‘कसौटी जिंदगी की…’मधून सर्वांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी आता वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 डिसेंबर : टीव्ही सिरिअल ‘कसौटी जिंदगी की…’मधून सर्वांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी आता वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकता कपूरच्या प्रॉडक्शनच्या अल्ट बालाजीची वेब सीरिज ‘हम तुम अँड देम’ (Hum Tum And Them) असं या वेब सीरिजचं नाव असून या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात श्वेता तिवारीचे अनेक लिपलॉक सीन पाहायला मिळत आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून श्वेता डिजिटल डेब्यू करणार आहे. एकता कपूरची वेब सीरिज ‘हम तुम अँड देम’ (Hum Tum And Them) एक फॅमिली ड्रामा आहे. ज्यात रोमान्सचा तडका सुद्धा आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत अक्षय ओबेरॉय हा श्वेता तिवारीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘चुलबुली गर्ल’ आलिया कसं ठेवते स्वतःला फिट, हे 2 पदार्थ आहेत Weak Point

‘हम तुम अँड देम’ (Hum Tum And Them)च्या ट्रेलरनुसार श्वेता तिवारी या वेब सीरिजमध्ये एका बेचैन आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षय एका बेजबाबदार वडीलांच्या रुपात दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून श्वेता तिवारीनं पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर इंटिमेट सीन दिले आहेत. या वेब सीरिजमध्ये श्वेताचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. ‘हम तुम अँड देम’ (Hum Tum And Them)मधील श्वेता तिवारीचा लुक सुद्धा खूप वेगळा आहे. याशिवाय अक्षय ओबेरॉयसोबत तिची खूप चांगली केमिस्ट्री खूप चांगली जमलेली दिसत आहे. ती माणसं नसून सैतान, हैदराबाद गँग रेप प्रकरणावर सलमान संतापला VIDEO : …आणि स्टेजवर पोहोचल्यावर रानू मंडल चक्क गाणंच विसरल्या!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात