जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पलक तिवारीचा व्हिडीओ सॉन्ग 'Bijlee Bijlee'चा टीजर रिलीज; VIDEO पाहून चाहत्यांनी म्हटलं, 'रेकॉर्ड तोड'

पलक तिवारीचा व्हिडीओ सॉन्ग 'Bijlee Bijlee'चा टीजर रिलीज; VIDEO पाहून चाहत्यांनी म्हटलं, 'रेकॉर्ड तोड'

पलक तिवारीचा व्हिडीओ सॉन्ग 'Bijlee Bijlee'चा टीजर रिलीज; VIDEO पाहून चाहत्यांनी म्हटलं, 'रेकॉर्ड तोड'

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिची मुलगी पलक तिवारीच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,29ऑक्टोबर- पलक तिवारी(Palak Tiwari) तिची आई आणि अभिनेत्री श्वेता तिवारीसारखी**(Shweta Tiwari)** बोल्ड आणि सुंदर आहे. आईप्रमाणेच तिला अभिनयाच्या जगात नाव कमवायचचं आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती पूर्णपणे सज्जआहे.  मात्र सध्या ती तिच्या आगामी ‘बिजली बिजली’ (Bijlee Bijlee) या म्युझिक व्हिडिओमुळे**(Music Video)** चर्चेत आली आहे. ज्याचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये पलक खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिची मुलगी पलक तिवारीच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याआधी तिने  या गाण्यातील तिच्या मुलीचा फर्स्ट लूक शेअर केला होता. अभिनेत्रीने काही तासांपूर्वी टीझर शेअर केला होता.  जो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.हे गाणं केवळ हार्डी संधूने गायलंच  नाही तर पलक तिवारीनेया गाण्यावर  परफॉर्मन्स सुद्धा केला आहे. गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. बी प्राकचे संगीत उत्कृष्ट आहे. टीझर पाहून चाहत्यांना वाटते की हे गाणे ‘तितलियां’चा रेकॉर्ड मोडेल. श्वेताच्या चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिच्या मुलीच्या गाण्यासाठी तिचं  अभिनंदन करत आहेत. प्रत्येकजण तिच्या मुलीच्या लुकचं कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये पलक वेगवेगळ्या लूकमध्ये  दिसून येत आहे. हार्डी संधूचं  हे गाणं  30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.दोन दिवसांपूर्वी श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर पलकच्या म्युझिक व्हिडिओची पहिली झलक चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच श्वेतानं सांगितलं की, तिला एक आई म्हणून अभिमान वाटत आहे. तिच्या पोस्टमध्ये, श्वेताने पलकच्या म्युझिक व्हिडिओची रिलीज डेट देखील उघड केली आहे. या महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ अल्बम रिलीज होणार आहे. आपल्या मुलीचं हे मोठं यश पाहून श्वेताचा आनंद गगनात मावत नाहीय. (हे वाचा: Baby Doll मैं सोने दी’ सनी लियोनीचा स्टायलिश साडीमध्ये क्युट अंदाज; फोटो पाहून ) दुसरीकडे, पलक तिवारीच्या डेब्यू प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर, विवेक ओबेरॉयचा ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट, मंदिरा एंटरटेनमेंट आणि प्रेरणा व्ही अरोरा मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. विशाल रंजन मिश्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अरबाज खान देखील दिसू शकतो. पलक ‘रोजी: द सॅफ्रोन चॅप्टर’‘या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात