नवी दिल्ली, 28 जानेवारी: कालपासून सोशल मीडियावर श्वेता तिवारी (Shweta Tiwari) प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्रीने श्वेताने माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असे खळबळजनक वक्तव्य करत नवा वाद निर्णाण केला आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये तिने Kiss My A**गाण्यावर रील्स बनवला आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीचा हा रील्स पाहून युजर्स चांगलेच संतापले आहेत. श्वेता तिवारीने आपल्या इंस्टाग्रामावर एक व्हिडीओ नुकतंच शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने रेड कलरचा सुट परिधान केला आहे. एका हॉटेलमधील कॉरिडॉरमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. यात तिच्यासोबत पायल सोनीही नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने खास कॅप्शनही शेअर केली आहे. ‘सुतळी बॉम्बसोबत सकाळचा डान्स’, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. श्वेताने या व्हिडीओदरम्यान एका इंग्रजी गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यात Kiss My A** असे एक वाक्य आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
लाज राख, अॅरेस्ट श्वेता तिवारी, श्वेता तु जे विधान केले आहेत माफी माग अशा अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर येत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतंच आपल्या आगामी ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यावेळी श्वेता तिवारीने ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. इतकंच नव्हे तर श्वेताच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे.