जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / या अभिनेत्रीमुळं मोडला प्रभुदेवाचा संसार; अनैतिक संबंधांविरोधात पत्नीनं केलं होतं उपोषण

या अभिनेत्रीमुळं मोडला प्रभुदेवाचा संसार; अनैतिक संबंधांविरोधात पत्नीनं केलं होतं उपोषण

या अभिनेत्रीमुळं मोडला प्रभुदेवाचा संसार; अनैतिक संबंधांविरोधात पत्नीनं केलं होतं उपोषण

प्रभुदेवा चित्रपटांसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या कलाकाराला त्याच्या पत्नीनं अनैतिक संबंधांमुळं कोर्टात खेचलं होतं. पाहूया काय होता तो प्रसंग…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 3 एप्रिल**:** प्रभुदेवा (Prabhu Deva) हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय डान्सर्सपैकी एक आहे. भारतातील ‘मायकल जॅक्सन’ (Indian Michael Jackson) म्हणून नावलौकीक मिळवणाऱ्या प्रभुदेवानं आजवर डान्ससोबतच कोरिओग्राफी, दिग्दर्शन आणि अभिनय देखील केला आहे. आज प्रभुदेवाचा वाढदिवस आहे. 48 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रभुदेवा चित्रपटांसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या कलाकाराला त्याच्या पत्नीनं अनैतिक संबंधांमुळं कोर्टात खेचलं होतं. पाहूया काय होता तो प्रसंग… प्रभुदेवाचं दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारावर (Nayanthara) प्रेम होतं. लग्न झाल्यानंतरही तो तिच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होता. नयनताराचं देखील प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिनं ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. प्रभुदेवाचं रामलताशी लग्न झालं होतं. नयनताराशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलतानं कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. शिवाय नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. अवश्य पाहा - Jaya Prada करणार होत्या आत्महत्या; Amar Singh यांच्यामुळं वाचले प्राण

जाहिरात

पुढे हा वाद विकोपाला गेला. त्यामुळं रामलता यांनी उपोषणाला बसण्याची धमकी दिली. दरम्यान अनेक महिला संघटनांनी देखील या वादात उडी घेत नयनतारावर जोरदार टीका केली. या टीकेमुळं नयनताराच्या करिअरला उतरती कळा लागली. अखेर 2011 साली  प्रभुदेवानं पत्नी रामलताला घटस्फोट दिला. पण या संपूर्ण गदारोळामुळं नयनतारासोबतचेही संबंध संपुष्टात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात