श्वेता शिंदे ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या श्वेता निर्मिती क्षेत्रात सुद्धा बरेच वेगवेगळे प्रयोग करताना दिसत असते.
खऱ्या आयुष्यात देवमाणूस लागिरं झालं जी सारख्या मालिकांची निर्मिती करणाऱ्या श्वेताचं लग्न संदीप भन्साळी यांच्याशी झालं आहे.
या कपलची लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे. या कपलची पहिली भेट कशी झाली त्यांचं नेमकं कस जमलं याबद्दल श्वेता झी मराठीच्या ‘बँड बाजा वरात’ कार्यक्रमात बोलताना दिसली.
श्वेता आणि संदीप यांची पहिली भेट शूटिंगच्या सेटवर झाली. आणि पहिल्याच भेटीत त्यांचं जोरदार भांडण झालं.
या खडाजंगी भांडणानंतर श्वेताच्या वाढदिवशी संदीप यांनी सरप्राईज प्लॅन करून तिच्यासाठी सेटवर केक मागवला.
श्वेताला याबद्दल कल्पना नसल्याने तिलाही आनंद झाला. जेव्हा तिला या सर्प्राइजबद्दल समजलं तेव्हा तिलाही आश्चर्य वाटलं. संदीप यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं भांडण मिटलं.
संदीप भन्साळी हे एक डिजिटल मेन्टर आहेत. तसंच त्यांचं मार्केटिंग क्षेत्रात सुद्धा ज्ञान आहे असं त्यांच्या सोशल मीडियावरून कळून येतं.
श्वेता आणि संदीप यांचं मिलन म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा आणि सिंधी कढीचा संगम अशी उपमा त्यांना दिली जात आहे.