श्रुति हासन म्हणजे सुपरस्टार कमल हासनची लेक. अभिनेत्री असलेल्या श्रुतीने तिच्या प्रियकराच्या कलाकृतीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. खोलीच्या सर्व बाजूंनी श्रुतीचा प्रियकर शंतनूने केलेलं आर्ट वर्क आहे. श्रुती हसनने तिचा प्रियकर शंतनू हझारिकाच्या कलाकृतींची मनमोहक छायाचित्रं शेअर केली आहेत. श्रुति हासन गेल्या काही महिन्यांपासून शंतनुबरोबर रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. कमल हसन आणि सारिका यांची मुलगी श्रुती हसनची चर्चा बॉलिवूडमध्ये तसेच तिच्या चाहत्यांमध्येही होत असते. श्रुतीचा बॉयफ्रेंड शंतनु दिल्लीचा डूडल आर्टिस्ट आहे. 2014 च्या ‘डूडल आर्ट कॉम्पिटीशन’ मध्ये त्याने सर्वोत्कृष्ट डूडल आर्टिस्ट अवॉर्डही जिंकला. श्रुति हसन तिच्या फोटोशूट्समुळे बर्याचदा चर्चेत असते. श्रुती नुकतीच पवन कल्याणच्या ‘वाकील साब’ या चित्रपटात दिसली होती. श्रुती हासन लवकरच ‘सालार’ चित्रपटात बाहुबली स्टार प्रभाससोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे.