प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरन नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचा पती आणि मुलगी राधासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता ती तिच्या परदेशी पतीसोबत रोमँटिक झाली आहे. त्याने स्वतः त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही लिपलॉक करताना दिसत आहेत. त्यामुळं आता या जोडप्याचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या श्रेया सरन विदेशी पती आंद्रेई कोस्चिवसोबत सुट्टीसाठी गोव्याला गेली आहे. तिथून ती रोज मुलगी राधासोबत मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
श्रेया सरन सुट्टीवर आहे आणि गोव्यात तिच्या पतीसोबत रोमँटिक क्षण घालवत आहे. त्यामुळं तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये श्रेया आधी आंद्रेई कोस्चिवसोबत रोमँटिक मूड मध्ये लिपलॉक करताना दिसत आहेत.
यापूर्वी तिनं मुलगी राधासोबत मस्ती करतानाचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या सुट्टीत ती आपल्या मुलीसोबत गेली आहे. श्रेयाने राधाच्या जन्मानंतर एक वर्षानंतर आई झाल्याचा खुलासा केला होता.
लॉकडाऊन दरम्यान ती प्रेग्नेंट झाली होती. आणि याच काळात ती आई ही झाली. श्रेयाने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही काम केलेलं आहे. 2015 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.