मुंबई, 17 ऑगस्ट- 90-2000 च्या दशकात दूरदर्शन मनोरंजनाचं प्रमुख साधन होतं. त्या काळात दूरदर्शनवरील अनेक टीव्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. रामायण, महाभारत आणि श्रीकृष्णसारख्या पौराणिक विषयांवरच्या मालिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात या मालिकांचं पुर्नप्रक्षेपण करण्यात आलं. या कालावधीतही प्रेक्षकांनी या मालिकांना चांगला प्रतिसाद दिला. रामानंद सागर यांची लोकप्रिय श्रीकृष्ण ही मालिका आजही लोकांच्या स्मरणात कायम आहे. या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांचं मन जिंकलं. रामायण मालिकेतील अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया असो अथवा श्रीकृष्ण मालिकेतील स्वप्नील जोशी आणि श्वेता रस्तोगी हे कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. श्रीकृष्णा मालिकेत किशोरवयीन राधेची भूमिका श्वेता रस्तोगी या अभिनेत्रीनं केली होती. ही अभिनेत्री आजही छोट्या पडद्यावर अधिराज्य करत आहे. तिनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. श्वेताशी निगडीत काही रोचक गोष्टी आहेत.
दूरदर्शनवरून दर रविवारी प्रसारित होणारी श्रीकृष्ण ही टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. ही मालिका सुरू होताच घरातली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सर्व कामं सोडून टीव्हीसमोर बसत असत. या मालिकेत मोठ्या राधेची भूमिका रेश्मा मोदीने तर किशोरवयीन राधेची भूमिका श्वेता रस्तोगी हिनं केली होती. या दोन्ही अभिनेत्रींनी साकारलेली राधा प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. यापैकी श्वेता रस्तोगीने बालकलाकार म्हणून टीव्ही इंडस्ट्री (TV Industry) आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं अनेक मालिकांमध्ये तसंच चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका केल्या. पण तिचा हा प्रवास काहीसा विलक्षण राहिला.
श्वेता रस्तोगीचा जन्म 1973 मध्ये झाला. ती मूळची मेरठ येथील आहे. सध्या ती पतीसोबत मुंबईत राहते. तिचे आई-वडील मेरठमध्ये राहतात. आम्ही मूळचे बरेलीचे आहोत, असं श्वेताचे वडील सांगतात. श्वेताला घरात लाडानं चीना या नावानं बोलवतात. श्वेता चार वर्षांची असल्यापासून मालिकांमध्ये अभिनय करत आहे. या शिवाय बालकलाकार म्हणून तिनं चित्रपटांमध्येही काम केलं आहे. श्रीकृष्ण या मालिकेनंतर श्वेतानं 1995 मध्ये एका तमीळ चित्रपटात भूमिका केली होती. त्यानंतर तिनं पुन्हा मालिकांवर लक्ष केंद्रीत केलं. 1997 मध्ये जय हनुमान, 2004 मध्ये केसर, 2005 मध्ये वो रहनेवाली महलों की, 2006 मध्ये थोडी सी जमीं थोडा सा आसमान, स्त्री तेरी यही कहानी सारख्या मालिकांमध्ये श्वेतानं वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय श्री गणेशसारख्या मालिकेत ती दिसली होती. श्वेता अजूनही मालिकांमध्ये भूमिका करत आहे.
(हे वाचा: सैफ अली खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTO आले समोर; फॅमिली फोटोमधून सारा गायब ) मालिकांशिवाय श्वेतानं चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका केल्या आहेत. तिनं 90 च्या दशकात नायिकेच्या लहानपणीच्या किंवा तिच्या लहान मुलीच्या भूमिका साकारल्या आहेत. श्वेताने 1988 मध्ये रिलीज झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Actress Rekha) अभिनित `खून भरी मांग` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिनं रेखाच्या मुलीची भूमिका साकारली होती. अभिनेता अनिल कपूरच्या किशन कन्हैया या चित्रपटात श्वेतानं अनिल कपूरच्या (Anil Kapoor) मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1993 मध्ये श्वेता किशोरवयीन राधेच्या भूमिकेत रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत दिसली. (हे वाचा: Sachin Pilgaonkar B’day: गालावरच्या खळीनं केलं क्लीनबोल्ड! तुम्हाला माहितेय का सचिन-सुप्रियांची Love Story ) श्रीकृष्ण या मालिकेत श्वेताला मिळालेल्या भूमिकेमागे एक रंजक गोष्ट आहे. ज्या भूमिकेनं श्वेता घराघरात पोहोचली, त्या भूमिकेसाठीच्या ऑडिशनमध्ये ती फेल झाली होती. रामानंद सागर श्रीकृष्ण मालिकेसाठी किशोरवयीन राधेच्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होते. त्यावेळी श्वेतानं ऑडिशन दिली. परंतु, रामानंद सागर यांना तिची ऑडिशन (Audition) फारशी आवडली नाही. श्वेता संवादांच्या माध्यमातून रामानंद सागर यांना प्रभावित करू शकली नाही. परंतु, रामानंद यांना श्वेताचं सौंदर्य आणि साधेपणा भावला. अन्य कोणतीही अभिनेत्री या भूमिकेसाठी योग्य ठरत नव्हती. त्यामुळे रामानंद सागर यांनी श्वेताला अजून एक संधी दिली. त्यांनी श्वेताला नृत्य करण्यास सांगितलं. श्रीकृष्णासोबत श्वेता महारासमध्ये नृत्य करु शकेल की नाही, हे त्यांना पाहायचं होतं. इथं श्वेताचं भाग्य उजळलं. कारण ती शास्त्रीय नृत्य (Classical Dance) शिकलेली होती. श्वेतानं अतिशय सहजतेनं नृत्य करून दाखवलं आणि तिला राधेची भूमिका मिळाली. श्वेता सुंदर दिसण्यासोबत नृत्य कलेत पारंगत आहे. शूटिंगदरम्यान श्वेता आणि स्वप्नील जेव्हा राधा-कृष्णाच्या पेहेरावात असायचे तेव्हा ते स्वतः रामानंद सागर त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे दर्शन घेत. श्वेतानं राधेची साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. कृष्ण आणि राधेच्या भूमिकेसाठी आजही स्वप्नील जोशी आणि श्वेता रस्तोगी यांच्या जोडीला पसंती मिळते.