सैफ अली खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTO आले समोर; फॅमिली फोटोमधून सारा गायब
Happy Birthday Saif Ali Khan:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानकाल वाढदिवस होता. सैफच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये सैफ आणि करीना त्याच्या कुटुंबासह दिसत आहे. अभिनेत्याची बहीण सबा अली खान पतौडीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानकाल वाढदिवस होता. सैफच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये सैफ आणि करीना त्याच्या कुटुंबासह दिसत आहे. अभिनेत्याची बहीण सबा अली खान पतौडीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/ 8
सैफ अली खानने काल आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तसेच कुटुंबीयांनी त्याला खास सरप्राईजही दिलं आहे.
3/ 8
यावेळी सैफ आपल्या दोन्ही बहिणी सोहा सबासोबत मजामस्ती करताना दिसून आला.
4/ 8
सैफने आपल्या बर्थडे केकवरसुद्धा मनसोक्त ताव मारला. यावेळी सैफच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.
5/ 8
इतकंच नव्हे तर सेलिब्रेशनमध्ये सैफचा मोठा मुलगा इब्राहिमसुद्धा उपस्थित होता. परंतु यावेळी सारा अली खान गायब दिसली. तसेच सोहाचा पती कुणाल खेमूसुद्धा उपस्थित होता.
6/ 8
नेहमीप्रमाणे या फोटोंमध्ये सोहा आणि सैफ यांच्यामध्ये सुंदर बॉन्डिंग दिसून आलं.
7/ 8
सारा सेलिब्रेशनसाठी तर येऊ शकली नाही. परंतु तिने सोहळा मीडियावर आपल्या वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
8/ 8
साराच्या या क्युट फोटोवर चाहतेच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रेटीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.