जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोचं काय आहे श्रेयस तळपदेचं कनेक्शन? शेअर केली खास आठवण

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोचं काय आहे श्रेयस तळपदेचं कनेक्शन? शेअर केली खास आठवण

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोचं काय आहे श्रेयस तळपदेचं कनेक्शन? शेअर केली खास आठवण

श्रेयस तळपदेने नुकतीच एक जुनी आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मे- श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा मराठी मनोरंजन सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. मराठी नाटकं आणि चित्रपट गाजवणाऱ्या श्रेयसनं बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. सध्या तो झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्यात खूपच लोकप्रिय आहे. श्रेयस तळपदेने नुकतीच एक जुनी आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. श्रेयस तळपदेने प्रायोगिक व्यावसायिक नाटकात देखील काम केले आहे. इन्स्टावर एक जुना फोटो पोस्ट करत त्याने नाटकाची आठवण शेअर केली आहे. ही आठवण ऑल द बेस्ट या एकांकिकेची आहे. ऑल द बेस्ट ही एकांकिका गाजल्यांनंतर निर्माते मोहन वाघ यांनी या एकांकिकेचे दोन अंकी नाटक करण्याचे सुचवले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी केवळ अंकुशला कायम ठेवून इतर तीन पात्रांमध्ये संजय नार्वेकर, भरत जाधव आणि संपदा जोगळेकर यांना घेतले. पुढे या नाटकात कलाकारांचा संच बदलून दुसरे कलाकार आले. या दुसऱ्या फळीत श्रेयस होता. यावेळी एका प्रयोगाला मोहन वाघ यांनी बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना आमंत्रित केले होते. त्यावेळचा एक फोटो श्रेयसने शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. वाचा- ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार महत्त्वाची भूमिका ‘ऑल द बेस्ट’ नाटकाच्या पहिल्या संचात भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर हे कलाकरा होते. पुढे ते नाटक दुसऱ्या संचात बसवले गेले. या दुसऱ्या संचात श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे,वसंत आंजर्लेकर आणि लतिका सावंत यांचा सहभाग होता.

जाहिरात

श्रेयस तळपदेच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने आतापर्यंत मराठीप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाच ठसा उमठविला आहे. त्याने ‘पछाडलेला’, ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात