जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार महत्त्वाची भूमिका

'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार महत्त्वाची भूमिका


 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार महत्त्वाची भूमिका

'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार महत्त्वाची भूमिका

‘योगयोगेश्वर जयशंकर’ (yogyogeshwar jaishankar ) या मालिकेची गेली अनेक दिवस चर्चा आहे. ही मालिका येत्या 31 मेला कलर्स मराठीवर सुरू होत आहे. मालिकेत चिन्मय उद्गीरकर ( Chinmay Udgirkar) आणि उमा पेंढारकर (Uma Pendharkar) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मे: आपण कोणत्याही मंदिरात गेल्यावर आपल्याला एक फोटो कायम दिसतो तो म्हणजे योगयोगेश्वर जयशंकर महाराज यांचा. दोन्ही पाय छातीशी कवटाळलेले, डोक्यावर भंडारा आणि दाढी वाढवलेल्या जयशंकर महाराजांचा (Jaishankar Maharaj) फोटो आपल्यापैकी अनेकांनी स्वामी समर्थांच्या मठात किंवा इतर मंदिरांमध्ये पाहिला असेल. पण हे जयशंकर महाराज कोण असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. आता याच प्रश्न उत्तर लवकरच आपल्याला कलर्स मराठी वहिनीवर (Colors marathi) मिळणार आहे. ‘योगयोगेश्वर जयशंकर’ (yogyogeshwar jaishankar)  ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जयशंकर महाराजांचा जीवनप्रवास मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. अभिनेता चिन्मय उद्गीरकर (chinmay udgirkar)  महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर त्यासोबतच आता आणथी एक अभिनेत्री मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सर्वांची लाडकी अभिनेत्री उमा पेंढारकर  (uma pendharkar) या मालिकेत पार्वती बाईंची भूमिका वठवणार आहे. पार्वती बाई म्हणजे नक्की कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. उमा या आधी स्वामिनी या ऐतिहासिक मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर उमा आता योगयोगेश्वर जयशकंर या पौराणिक मालिकेत दिसणार आहे.

जाहिरात

काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठीने मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला होता. तेव्हापासूनच प्रेक्षकांना मालिकेविषयी उत्सुकता लागली होती. योगयोगेश्वर जयशंकर ही मालिका येत्या 30 मे पासून कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. महादेवाचा अंश असलेल्या योगयोगेश्वर जय शंकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास, श्री शंकर महाराजांचा जीवनअध्याय आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री उमा पेंढारकर विषयी बोलायचे झाले तर उमा ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. उमा अभिनेत्रीसह काऊंसिलर देखील आहे. तसेच उमाचे यूट्यूब चॅनल असून ती मेकअप,स्किनकेअर, लाईफ स्टाइलविषयी टिप्स देत असते. उमा ही फारच हसमुख. अभिनेत्री असल्याने तिचा अभिनय नेहमीच नैसर्गिक वाटतो. तिने स्वामिनी मालिकेत साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात