जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'किचन कल्लाकार' मध्ये संकर्षणची जागा घेणार श्रेया बुगडे! काय आहे कारण?

'किचन कल्लाकार' मध्ये संकर्षणची जागा घेणार श्रेया बुगडे! काय आहे कारण?

'किचन कल्लाकार' मध्ये संकर्षणची जागा घेणार श्रेया बुगडे! काय आहे कारण?

‘किचन कल्लाकार’मध्ये संकर्षणची जागा महाराष्ट्राची लाडकी लेक श्रेया बुगडे (Shreya Bugade) घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जानेवारी-   सध्या टीव्हीवर   (Marathi Tv Show)  अनेक मराठी रिएलिटी शो पाहायला मिळत आहेत. चाहते या शोला मोठी पसंतीसुद्धा देत आहेत. नुकताच झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’   (Kitchen Kalakar)  हा शो सुरु झाला आहे. यामध्ये कलाकारांच्या हातचे पदार्थ चाखायला मिळतात. यामध्ये महागुरू म्हणून अभिनेते प्रशांत दामले आहेत. तर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे   (Sankrshan Karhade)  आहे. परंतु नुकताच एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, संकर्षणची जागा महाराष्ट्राची लाडकी लेक श्रेया बुगडे    (Shreya Bugade)  घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. ‘किचन कल्लाकार’ शोने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या शोमध्ये कलाकारांपासून राजकीय व्यक्ती सहभाग घेतात. प्रेक्षकांना या शोची भुरळ पडली आहे. येणारे पाहुणे मंडळी चमचमीत पदार्थ तर बनवतातच शिवाय मजेशीर टास्क करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. या शोमध्ये प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडेच्या उपस्थितीने आणखी चार चाँद लागले आहेत. परंतु नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार या शोमध्ये संकर्षण कऱ्हाडेच्या जागी आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. संकर्षणने शो सोडला का? किंवा अजून काही झालं का? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जाहिरात

तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो,रिपोर्टनुसार, ‘किचन कल्लाकर’ मध्ये श्रेया बुगडेची एन्ट्री होणार आहे. परंतु ती काही दिवसांसाठी असेल. कारण रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलं आहे, की संकर्षण कऱ्हाडे काही कारणासाठी शोमधून ब्रेक घेत आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थित अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. संकर्षण आपलं काम आटोपल्यांनंतर पुन्हा या शोमध्ये दिसून येणार आहे. एकीकडे संकर्षणचे चाहते नाराज झाले असले. तरी दुसरीकडे श्रेया बुगडेचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. श्रेया आणि संकर्षण दोघेही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे दोघांचीही लोकप्रियता अफाट आहे. (हे वाचा: ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत ‘सरिता’ साकारणारी प्राजक्ता आपल्या भूमिकेबद्दल म्हणते ) श्रेया बुगडे ‘किचन कल्लाकार’ मध्ये येणार म्हणजे या शोमध्ये आता फोडणीसोबतच विनोदाचा तडका लागणार हे नक्की. प्रेक्षक श्रेयाला या शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले. अजून श्रेया किंवा संकर्षणकडून याबद्दल अधीकृत माहिती मिळालेली नाही. श्रेया सध्या आपल्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये बिझी आहे. तर संकर्षणसुद्धा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे. श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो सनी व्हिडीओ शेअर करत असते. तर किचन कल्लाकारबद्दल बोलायचं झाल्यास, नुकताच या शोमध्ये श्रुती मराठे, संतोष जुवेकर आणि वैभव तत्ववादीने हजेरी लावली होती. या तिघांनी शोमध्ये प्रचंड धम्माल केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात