Home /News /entertainment /

सिद्धांतच नाही तर श्रद्धा कपूरचंही ड्रग्ज प्रकरणात आलं होतं नाव, वाचा काय होतं प्रकरण

सिद्धांतच नाही तर श्रद्धा कपूरचंही ड्रग्ज प्रकरणात आलं होतं नाव, वाचा काय होतं प्रकरण

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिद्धांतच नाही तर यापूर्वी श्रद्धाचंही ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलं होतं.

  मुंबई, 13 जून : मनोरंजनसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलं (Siddhant Kapoor was arrested by the police in a drug case) आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सुशांत सिंग ड्रग्ज प्रकरणानंतर (Sushant singh drugs case) अनेक ड्रग्ज प्रकरणं समोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणांमध्ये अनेक कलाकारांची नावं पुढे आली आणि आज या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला. ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली सिद्धांतला बंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये पार्टी करताना पकडलं आहे. सिंद्धांतच्या पहिले त्याची बहिण श्रद्ध कपूरचंही (Shraddha Kapoor) नाव ड्रग्ज प्रकरणांमध्ये आलेलं पहायला मिळालं आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर श्रद्धा कपूरही होती. एनसीबीनं श्रद्धाला नोटीस बजावली होती. लोणावळ्यातील सुशांतच्या फार्म हाऊसवर पार्टीत श्रद्धा उपस्थित असल्यानं तिचीही चौकशी करण्यात आली.

  संबंधित बातम्या -  Drug abuse: Raid मध्ये सापडला श्रद्धा कपूरचा भाऊ; पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

  ती पार्टीत सहभागी झाली होती. मात्र, तिने ड्रग्स घेतलेले नाही, असं श्रद्धानं एनसीबीला सांगितलं. तिनं ड्रग्ज घेत नसल्याचं स्पष्ट केलं. श्रद्धा कपूर व्यतिरिक्त अनेक कलाकारांनी नाव या यादीत आली होती. श्रद्धा व्यतिरिक्त दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती. एनसीबीनं अनेकांची चौकशी केली. सुशांत सिंह मृत्यूनंतर या प्रकरणाचे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात पडसाद उमटलेले पहायला मिळाले. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सिद्धांतसह आणखी सहा जणांना बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिद्धांतही मनोरंजन सृष्टीत कार्यरत असून त्यानं ‘शूटआउट अॅट वडाला’, ‘हसीना पारकर’, ‘जज्बा’ आणि क्राइम-थ्रिलर वेब सीरिज ‘भौकाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिद्धांत हा 37 वर्षांचा आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Drugs, Shraddha kapoor, Shraddha kapoor.siddhant kapoor, Sushant singh rajput case

  पुढील बातम्या