मुंबई, 13 जून : बॉलिवूडमधून (Bollywood) एक मोठी बातमी समोर आली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर (Sushant Singh Rajput Case) ज्या प्रकारे ड्रग्ज प्रकरणात सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. ही सर्व धक्कादायक राहिली आहेत. या यादीत आता अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Actress Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरचे (Shraddha Kapoor Brother Detained) नाव आले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत याला बेंगळुरूमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सिद्धांतला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज टेस्टमध्ये श्रद्धा कपूरच्या भावासह एकूण सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्वजण बंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये पार्टी करत होते. तेथे पोलिसांनी छापा टाकला होता. श्रद्धाचीही झाली होती चौकशी - तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ड्रग्ज प्रकरणात सिद्धांतची बहीण श्रद्धा कपूरचेही नाव आले होते. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर एनसीबीच्या रडारखाली आली होती. या संदर्भात एनसीबीच्या टीमने श्रद्धा कपूरचीही चौकशी केली होती. श्रद्धा कपूर आणि सुशांत यांनी एकत्र छिछोरे हा चित्रपट केला होता. श्रद्धा कपूरबद्दल असं म्हटलं जात होतं की, ती अनेकदा लोणावळ्यातील सुशांतच्या फार्म हाऊसवर पार्टीत गेली होती. चौकशीदरम्यान, अभिनेत्रीने एनसीबीला तिने सांगितले होते की, ती पार्टीत सहभागी झाली होती. मात्र, तिने ड्रग्स घेतलेले नाही. ड्रग्ज घेण्यास अभिनेत्री श्रद्धा कपूरने पूर्णपणे नकार दिला होता.
Karnataka | Actor Shraddha Kapoor's brother Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party in a Bengaluru hotel, last night. He is among the 6 people allegedly found to have consumed drugs: Bengaluru Police pic.twitter.com/UuHZKMzUH0
— ANI (@ANI) June 13, 2022
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, भंगाराच्या दुकानातून तब्बल 1105 काडतुसे जप्त शक्ती कपूर यांचा मुलगा - दरम्यान, आता पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलं आहे तो, सिद्धांत कपूर हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. मात्र, सिद्धांतची कारकीर्द फ्लॉप ठरली. चित्रपटांव्यतिरिक्त, तो वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. पण आजपर्यंत अशी कोणतीच भूमिका त्याला ओळख देऊ शकली नाही. हसीना पारकर या चित्रपटात सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट चांगलाच गाजला. सिद्धांतचा मागील रिलीज चेहरे होती. या चित्रपटाचीही अवस्था त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच फ्लॉप ठरली.