Home /News /entertainment /

ड्रग्स प्रकरणात जामीन मिळताच कुठे निघाला श्रद्धा कपूरचा भाऊ? फ्लाईटमधील फोटो आला समोर

ड्रग्स प्रकरणात जामीन मिळताच कुठे निघाला श्रद्धा कपूरचा भाऊ? फ्लाईटमधील फोटो आला समोर

siddhant Kapoor drugs case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ (Shraddha Kapoor Brother) आणि ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा (Shakti Kapoor Son) सिद्धांत कपूरला (Siddhant Kapoor) नुकतंच ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जून-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ  (Shraddha Kapoor Brother)  आणि ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा   (Shakti Kapoor Son)  सिद्धांत कपूरला   (Siddhant Kapoor)  नुकतंच ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. त्यांनतर काही तासांतच त्याला जामीन मिळाला होता. आता अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर करत युजर्सना आपल्या अपडेट्स दिल्या आहेत . नुकतंच हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला शक्ती कपूर यांचा मुलगा अभिनेता सिद्धांत कपूर याला जामीन मिळाला आहे. सिद्धांतच्या अटकेनंतर सर्वच चकित झाले होते. नेहमीच लाइमलाईट पासून दूर असणारा सिद्धांत ड्रग्स प्रकरणात अडकल्याने सर्वानांच धक्का बसला होता. सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा सुरु होती. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सिद्धांत बेंगळुरूहून आपल्या घरी मुंबईला परतत असल्याचं दिसत आहे. सध्या हा फोटो बराच चर्चेत आहे. सिद्धांतने काही तासांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर केला. फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची एक मैत्रीणही दिसून येत आहे.दोघेही एकत्रच बसलेले दिसत आहेत. दोघांनी चेहऱ्यावर मास्कलावला आहे. फोटो शेअर करत, सिद्धांतने रेड हार्ट इमोजी आणि इतरही काही इमोजी शेअर केले आहेत. (हे वाचा: धक्कादायक! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला मिळाली बलात्काराची धमकी; घ्यावी लागली पोलिसांची मदत) रविवारी (12 जून) एका रेडमध्ये शक्ती कपूर यांचा मुलगा आणि श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरला रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.त्यांनतर आता त्याला जामीन मिळाला आहे. सिद्धांतसोबत पकडलेल्या अन्य चार जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासात सिद्धांतने ड्रग्ज घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र आता जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईला रवाना झाला आहे.रविवारी रात्री उशिरा एमजी रोडवरील एका पॉश भागात रेव्ह पार्टी सुरू होती. त्यादरम्यान पोलिसांनी रेड टाकली होती. याठिकाणी कुणाजवळही ड्रग्ज सापडले नव्हते. पण जवळच एमडीएमए आणि गांजा पडलेला आढळला. सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता सिद्धांतसह 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Shraddha kapoor

    पुढील बातम्या