मुंबई,13 एप्रिल- बॉलिवूडमधील सर्वात गोड आणि सुंदर अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर ला ओळखलं जातं. श्रद्धा नेहमीच आपल्या साधेपणने चाहत्यांचं मन जिंकत असते. एक स्टारकिड असूनसुद्धा श्रद्धाने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकीकडे स्टारकिड्सनां नेटकरी नापसंती दर्शवत असताना दुसरीकडे श्रद्धाला मात्र तितकंच प्रेम देत असतात. परंतु आता श्रद्धा आपल्या एका व्हिडीओमुळे चांगलीच ट्रोल होत आहे. श्रद्धाने नुकतंच एका कार्यक्रमात परिधान केलेल्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. सोशल मीडियावरसुद्धा श्रद्धाची अफाट फॅनफॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धाला तब्बल 79.9 मिलियन लोक फॉलो करतात. श्रद्धा नेहमीच आपल्या हटके पोस्ट आणि सुंदर लूकमुळे चाहत्यांची वाहवाह मिळवत असते.
एक अभिनेत्री आणि स्टारकिड असूनसुद्धा श्रद्धाच्या वागण्यातला साधेपणा लोकांना भावतो. सोबतच मराठीवर असलेलं तिचं प्रेम चाहत्यांना आवडतं. त्यामुळे चाहते श्रद्धाला भरभरुन प्रेम देत असतात. (हे वाचा: अभिनेत्रीला मंदिरात किस करणं पडलेलं महागात, सोडणार होती अभिनय, आता येतेय नवी सीरिज ) मात्र आता आपल्या एका लुकमुळे श्रद्धा कपूरने चाहत्यांना नाराज केलं आहे. तुझ्याकडून अशी अपेक्षा नसल्याचं चाहत्यांचा म्हणणं आहे. आम्हाला तू आहे तशीच साधी गोड पसंत आहेस असंही अनेकांनी म्हटलं आहे. नुकतंच एका कार्यक्रमात श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्रीने साडी परिधान केली होती. मात्र तिला वेस्टर्न टच देण्यात आला होता. श्रद्धाचा रिव्हिलिंग ब्लाउज अनेकांना खटकला. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल व्हावं लागत आहे. मात्र श्रद्धाला अनेक चाहत्यांना अतिशय सुंदर दिसत असल्याचं सांगत तिचं कौतुक केलं आहे. श्रद्धा कपूर नुकताच पार पडलेल्या जिओ स्टुडिओच्या एका कार्यक्रमात पोहोचली होती. यामध्ये इंडस्ट्रीतील जवळजवकल सर्वच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी श्रद्धा कपूरने लाल रंगाची सुंदर अशी शिमरी साडी परिधान केली होती. शिवाय तिने डीप नेकचा वेस्टर्न टच दिलेला ब्लाउज परिधान केला होता. श्रद्धा कपूरचा हा अंदाज तिच्या काही चाहत्यांना आवडला. पण काही चाहते अभिनेत्रीच्या या रिव्हिलिंग लुकने नाराज झाले आहेत.
काहींनी कमेंट्स करत म्हटलंय, ‘ती इंडस्ट्रीत परत येण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळेच आता जान्हवीच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे’. तर काहींनी लिहलंय, तुलासुद्धा या गोष्टींची गरज पडलीच. तर आणखी एकाने लिहलंय, ‘तर आता तुलाही लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रिव्हील ड्रेस घालण्याची आवश्यकता वाटत आहे’. तर चाहत्यांनी अभिनेत्रीला लाल साडीत तू अतिशय सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे.