नुकतंच 'टूथपरी' या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमधील अभिनेत्रीचंही प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.
यामध्ये अभिनेत्री तान्या मानिकतला झळकणार आहे. तान्या याआधी ईशान खट्टरच्या 'ए सुटेबल बॉय'मध्ये झळकली होती.
यादरम्यान तान्या प्रचंड तणावात आली होती. पण तत्पूर्वीच तिने अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार केला होता.
कारण अभिनेत्रीच्या मते ती ऑडिशन देऊन आणि रिजेक्शन पाहून कंटाळली होती. दरम्यान ती विदेशला निघाली असता तिला ही ऑफर मिळाली होती.