मुंबई, 28 एप्रिल- लोकप्रिय सेलिब्रिटीसारखं दिसण्यासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. नुकतंच बीटीएसमधील एका कलाकारासारखं दिसण्यासाठी एका कोरियन अभिनेत्याने अफाट शस्त्रक्रिया करुन घेतल्या होत्या. या गोष्टीचा इतका विपरीत परिणाम झाला की या तरुण अभिनेत्याला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान आता आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहेत. आणखी एका मॉडेल ने विविध शस्त्रक्रिया करत आपला जीव गमावला आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या किम कार्दशियनची कार्बन कॉपी समजली जाणारी कॅलिफोर्नियाची मॉडेल क्रिस्टीना ऍश्टनचा मृत्यू झाला आहे. ही मॉडेल अवघ्या 34 वर्षांची होती. हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी क्रिस्टीना ऍश्टनने प्लास्टिक सर्जरी केली होती.
त्यानंतर तिला किमसारखा चेहरा आणि फिगर मिळाली होती. क्रिस्टनचं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. क्रिस्टीनाच्या कुटुंबीयांनी 26 एप्रिल रोजी सोशल मीडियावर तिच्या मृत्यूची बातमी दिली होती. या दु:खद बातमीमुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. (हे वाचा: लग्नानंतरही या 5 सेलिब्रेटींचे होते अनैतिक संबंध,होणार होता घटस्फोट,पण झालं असं काही आज आहेत पॉवर कपल ) मॉडेल क्रिस्टीना ऍश्टनने अनेक प्लास्टिक सर्जरी करत किमसारखा चेहरा आणि फिगर मिळवला होता. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर ती हुबेहुब किमसारखी दिसायला लागली होती. किमसारखी दिसत असल्यामुळे क्रिस्टिनाला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे सोशल मीडियावर तिची चांगली फॅन फॉलोइंगसुद्धा होती. 20 एप्रिल रोजी ही दुःखद घटना घडल्याची माहिती मॉडेलच्या कुटुंबीयांनी दिली आहे. ही दुःखद माहिती शेअर करत मॉडेल क्रिस्टीना ऍश्टनच्या कुटुंबाने सांगितलं की, ‘20 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4.31 वाजता आमच्या कुटुंबाला एक दुःखद फोन आला. दुसऱ्या बाजूला, कुटुंबातील एक सदस्य ओरडत होता आणि रडत होता… ऍश्टन मरत आहे, ऍश्टन मरत आहे. एका फोन कॉलने आमचं जग क्षणार्धात उध्वस्त झालं. कुटुंबाचं म्हणणं आहे की, तिच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया बिघडल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला’.