मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक सेलिब्रेटी घटस्फोट घेत अनेक वर्षांचा आपला संसार मोडत आहेत. पण इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत ज्यांनी विभक्त होण्याच्या मार्गावर असताना अचानक यू टर्न घेत सुखाचा संसार केला आहे.
90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदाने वयाच्या २४ व्या वर्षी सुनीतासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर गोविंदा अभिनेता बनला होता. मात्र, दोघांच्या लग्नात अनेक ट्विस्ट्स आले. गोविंदाचं नाव राणी मुखर्जीसोबत जोडलं गेलं होतं. यानंतर सुनीताने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर अचानक सुनीताने आपला निर्णय बदलला आणि लग्नाला दुसरी संधी दिली. आज दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात.
70 आणि 80 च्या दशकातील सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांनी 1987 मध्ये पूनम सिन्हासोबत लग्न केलं आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनातही अनेक चढ-उतार आले. शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. पण पूनमने पतीला आणखी एक संधी दिली आणि नंतर दोघेही आजपर्यंत आनंदाने एकत्र आहेत.
दिग्गज दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्या वयात तब्बल 22 वर्षांचं अंतर होतं. तरीसुद्धा सायरा दिलीप कुमार यांच्यावर प्रचंड प्रेम करत होती. सायरा बानो यांनी 11 ऑक्टोबर 1966 रोजी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतरही दिलीप कुमार यांच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या बातम्या येतच राहिल्या. दिलीप कुमार त्यावेळी मधुबाला यांच्यासोबतही रिलेशनशिपमध्ये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप कुमार अभिनेत्री असमालाही डेट करत होते. पण त्याचवेळी असामासुद्धा तिसऱ्या कोणाला डेट करत होती. हे पाहून अभिनेत्याचे डोळे उघडले आणि त्यांनी सायरा बानूसोबत सुखाचा संसार केला.
अभिनेत्री योगिता बालीने किशोर कुमारसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं लग्न मोडलं. यानंतर योगिताने 1979 मध्ये मिथुन चक्रवर्तीसोबत लग्न केलेलं. मिथुनसोबत लग्नानंतर त्यांच्या नात्यात अनेक चढउतार आले. मात्र, योगिताने पुन्हा त्यांच्या लग्नाला दुसरी संधी दिली आणि त्यानंतर दोघेही आनंदी आहेत.
राज कपूर यांनी 1946 मध्ये कृष्णा यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. राज कपूरचे नर्गिससोबतचे अफेअर वैवाहिक जीवनात भांडणाचं कारण ठरलं होतं. यानंतर राज कपूर यांचं वैजंतीमालासोबतचं नातं पुन्हा एकदा वादाचं कारण ठरलं होतं. एकदा कृष्णा राज कपूर यांना सोडून निघून गेल्या होत्या. पण नंतर कृष्णाने त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी दिली आणि ते नंतर आयुषभर सोबत राहिले.