मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

धक्कादायक! कोरियोग्राफर गणेश आचार्यवर लैंगिक छळाचा आरोप,पोलिसांनी दाखल केली चार्जशीट

धक्कादायक! कोरियोग्राफर गणेश आचार्यवर लैंगिक छळाचा आरोप,पोलिसांनी दाखल केली चार्जशीट

पुन्हा एकदा बॉलिवूडमधून   (Bollywood)  एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक (Choreographer) गणेश आचार्य   (Ganesh Acharya)  यांच्यावर लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 एप्रिल- पुन्हा एकदा बॉलिवूडमधून   (Bollywood)  एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक (Choreographer) गणेश आचार्य   (Ganesh Acharya)  यांच्यावर लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं आहे. गणेश आचार्य यांच्यावर 2020 मध्ये त्यांच्या एका को-डान्सरने आरोप केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणाचा तपास करणारे ओशिवराचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी म्हटलं आहे, अंधेरी येथील संबंधित महानगर दंडाधिकारी न्यायालयात नुकतंच आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, संदीप शिंदे यांनी सांगितलं की, गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354-A (लैंगिक छळ), 354-C (स्टारिंग), 354-डी (गणेश आचार्य लैंगिक छळ प्रकरण) , 509 (कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे), 323 (दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे), कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (गुन्हा करण्याचा सामान्य हेतू) या सर्व आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, 35 वर्षीय को-डान्सरने सांगितलं की, ''तिला पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. गणेश आचार्य यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अनेक सहकर्मचाऱ्यांनी यापूर्वीही गणेशवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. गणेशने त्यांना वारंवार नाकारलं असून सर्व आरोप खोटे आणि निराधार म्हटलं आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, 'गणेश आचार्यने तिला कथितरित्या सांगितलं की, जर तिला यशस्वी व्हायचं असेल तर मे 2019 मध्ये तिला त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल. तिने नकार दिला आणि सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचं सदस्यत्व रद्द केलं'

First published:

Tags: Bollywood News, Dancer, Entertainment