मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shocking! Netflix वरील प्रसिद्ध सीरिजच्या 2 अभिनेत्यांचा रस्ते अपघातात मृत्यू; आणखी 6 जणं गंभीर जखमी

Shocking! Netflix वरील प्रसिद्ध सीरिजच्या 2 अभिनेत्यांचा रस्ते अपघातात मृत्यू; आणखी 6 जणं गंभीर जखमी

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही अभिनेत्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही अभिनेत्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही अभिनेत्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

नवी दिल्ली, 19 जून : नेटफ्लिक्स (Netflix series) सीरिज The Chosen One फेम अभिनेते Raymundo Gurdano आणि Juan Francisco Aguilar यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 16 जून रोजी मेक्सिको स्थित Baja California Sur Peninsula च्या Mulege जवळ त्यांची गाडी पलटी झाली. या अपघातात दोन्ही अभिनेत्यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही अभिनेत्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेत सीरिजमधील दोन कास्ट मेंबर्स आणि चार क्रू मेंबर्सदेखील जखमी झाले आहे. सर्वांनाच जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

E  News ने दिलेल्या माहितीनुसार, टीम मेक्सिकोमध्ये द चोजेन वन याची शूटिंग करीत होती. शूटिंग संपल्यानंतर टीम लोकल एअरपोर्टच्या दिशेने जात होती. यादरम्यान हा अपघात घडला. अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर Redrum कंपनीने या नेटफ्लिक्स सीरिजचं प्रॉडक्शन थांबवलं आहे. एप्रिल महिन्यात या सीरिजचं शूटिंग सुरू झालं होतं.

Baja California Department of Culture यांनी 17 जून रोजी फेसबुकच्या माध्यमातून दोन्ही अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं.

The Chosen One ही एक ब्राझीलीयन थ्रिलर सीरिज आहे. 2019 मध्ये याला लॉन्च करण्यात आलं होतं. ही सीरिज मार्क मिलर आणि पीटर ग्रॉसची कॉमिक बुक सीरिज अमेरिकन जीससवर आधारित आहे. नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार, ही सीरिज जीजसचा अवतार असलेल्या एका 12 वर्षांच्या तरुणाची कहाणी आहे. माणुसकीला वाचवण्यासाठी त्याचा जन्म झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Netflix, Road accident