जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'खतरों के खिलाडी' शोमध्ये सहभागी न होण्यावरुन कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं सोडलं मौन, म्हणाला...

'खतरों के खिलाडी' शोमध्ये सहभागी न होण्यावरुन कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं सोडलं मौन, म्हणाला...

'खतरों के खिलाडी' शोमध्ये सहभागी न होण्यावरुन कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं सोडलं मौन, म्हणाला...

‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार पहायला मिळणार आहे. ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये सहभागी न होण्यावरुन कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : टीव्हीचा सर्वात धोकादायक आणि धाडसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ (Khatro ke khiladi) लवकरच त्याच्या नवीन सीझनसह टीव्हीवर धडकणार आहे. केपटाऊनमध्ये त्याचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. यंदाचा सीझन ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार पहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा सीझन आणखीनच धमाकेदार होणार असल्याचं पहायला मिळत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीही (Comedian Munawar Farooqi)  या सीझनमध्ये झळकणार होता. त्याचं नावही समोर आलं होतं मात्र अशातच मुनाव्वरनं याविषयी आपलं मौन सोडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुनव्वरवरुन  (Munawar Farooqi latest news) चर्चा रंगली होती. तो नक्की या सीझनचा भाग बनणार आहे का नाही यावरुन गोंधळ उडाला होता. आता मुनव्वरनं स्वतः याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुनव्वरनं म्हटलं की, मित्रांनो, काही कारणास्तव मी खतरो कें खिलाडीचा भाग बनू शकत नाही. मला माफ करा. माझं खूप मन होतं की यामध्ये भाग घ्यावा मात्र नशीबाला दुसरं काहीतरी मंजूर होतं. मला माहिती आहे शोमध्ये मी जाऊ न शकल्यामुळे तुम्ही सगळे दुःखी आहात मात्र जाऊ न शकल्याचं दुःख मला पण आहे. तुमचं मनोरंजन नेहमीच करत राहिल. सध्या थोडाचा वेळ एकट्यासाठी हवा आहे.

जाहिरात

मुनव्वरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांनी शोमध्ये सहभागी होऊ न शकल्यामुळे दुःखही व्यक्त केलं आहे. मात्र चाहते त्याच्या सोबत असल्याचंही त्यांनी मुनव्वरला कमेंट करत म्हटलं आहे. मुनव्वरला नक्की काय झालंय असा प्रशन्ही उपस्थित केला जात आहे. यावर मुनव्वरनं अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, कॉमेडियन मुनव्वर फारुकी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन तो चर्चेचा विषय ठरत असतो. नुकतंच त्याचं आणि त्याची गर्लफ्रेंडचं गानं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव हलकी सी बरसात असं आहे. हे गाणंही चांगलंच हिट ठरलं. यावर 10 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत आणि गाणं यूट्यूबलाही ट्रेंड करत होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात