जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / इस्राईलच्या रस्त्याला मिळणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

इस्राईलच्या रस्त्याला मिळणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

इस्राईलच्या रस्त्याला मिळणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इस्राईलचे conculate यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी- आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळं वातावरण कसं शिवमय झालं आहे. राज्यभरात उत्साहात शिव जयंती साजरी झाली. विविध कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. आशातच आजच्य दिवशी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इस्राईलचे conculate यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा केली. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. वाचा- स्वरा भास्कर-फहाद अहमदचं लग्न अवैध? मौलानांचं मोठं विधान दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ईस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईल चे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली.

जाहिरात

त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिक्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिक्पाल लांजेकर यांनी भेट दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना.. 🚩जय शिवराय🚩…अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटानंतर दिग्दर्शन दिग्पाल त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. याबद्दल त्यांचे कौतुक तर होतच आहे. शिवाय त्यांच्यावर चाहत्यांकडूव अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात