अभिनेत्री आपल्या गुपचूप लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बरेलीमधील दर्गा आला हजरतचे मौलाना शहाबुद्दीन, यांच्या मते, स्वरा आणि फहादचं लग्न मान्य नाहीय असं म्हणत त्यांनी खळबळ माजवली आहे.
स्वराने आधी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा तेव्हाच त्यांचं लग्न मान्य होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या मते शरियत इस्लाममध्ये , जेव्हा मुलगी मुस्लिम नसते पण तिने मुस्लिम मुलासोबत लग्न केलेलं असतं. तेव्हा हे लग्न अवैध मानलं जातं.
जेव्हा मुलगी इस्लाम धर्माचा स्वीकार करते आणि मुस्लिम मुलासोबत लग्न करते. तेव्हा हे लग्न ग्राह्य धरलं जातं. असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.