मुंबई 7 मे**:** राज्यातील कोरोना (coronavirus pandemic) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही. किंबहुना वाढतच चालली आहे. अगदी नामांकित सेलिब्रिटीही आता कोरोनाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. या यादीत आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. शिल्पाच्या एक वर्षांच्या मुलीसोबत संपुर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. (Covid-19 positive) तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र या प्रकरणामुळं अभिनेत्री प्रचंड मानसिक दबावाखाली आहे. सर्वप्रथम शिल्पाच्या सासु-सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पती आणि दोन्ही मुलांना कोरोना झाली. इतकंच काय तर तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला सुद्धा लागण झाली. केवळ शिल्पाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेले 10 दिवस शिल्पा सातत्यानं मानसिक दबावाखाली जगतेय. कारण दररोज तिच्या घरातील कोणा व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला आहे. शिल्पानं ही माहिती सोशल मीडियाव्दारे आपल्या चाहत्यांना दिली. शिवाय तिनं सर्वांना घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. करीना कपूर पोहोचली नानावटी रुग्णालयात; चाहत्यांना वाटतेय ‘बेबो’ची काळजी
केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 2 कोटी 10 लाख 77 हजार 410 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 72 लाख 80 हजार 844 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 23 हजार 168 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 35 लाख 66 हजार 398 करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत 16 कोटी 25 लाख 13 हजार 339 जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.